Jan dhan yojana KYC: तुमच्याकडे फक्त 25 दिवस, आताच करा हे काम नाहीतर बंद होणार Saving Account

Last Updated:

जनधन खात्यांसाठी 30 सप्टेंबर 2025 पूर्वी री-केवायसी अनिवार्य आहे. योग्य कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण न केल्यास खाते बंद होऊ शकते व सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही.

News18
News18
सेविंग अकाउंट असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडे फक्त 25 दिवस शिल्लक आहेत. आताच तुम्ही बँकेचं हे काम पूर्ण करुन टाका नाहीतर तुमचं खातं कायमचं बंद केलं जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुमच्याकडे फार कमी वेळ शिल्लक राहिला आहे. त्यात आधीच सप्टेंबर महिन्यात 15 दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे अडचणी येऊ शकतात. बँक कधी चालू आहे याची यादी देखील बँकेकडून घ्या.
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत जर तुमचं खातं असेल तर ही बातमी चुकवू नका. तुम्हाला या खात्याचं पुन्हा केवायसी करावं लागणार आहे. री केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे. ज्यांनी केलं नाही त्यांचं खातं निष्क्रिय केलं जाणार आहे. आतापर्यंत 55 कोटी लोकांनी जनधन योजनेंतर्गत खाती उघडली आहेत. त्यापैकी काही खाती बंद आहेत किंवा त्यावर कोणतेही व्यावहार केले जात नाहीत.
advertisement
फसवणूक होणार नाही काळजी घ्या!
ज्या खात्यांवर कोणतेही व्यवहार केले जात नाहीत, त्यांची खाती वापरून हॅकर्स फ्रॉड करायचा प्रयत्न करत आहेत. यासाठीच आता बँकेनं पुन्हा केवायसी करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत. याशिवाय जे केवायसी प्रक्रिया करणार नाहीत त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. हे करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. यासाठी आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
पत्ताही बदलता येणार?
1 जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये ग्रामपंचायत पातळीवर री केवायसी सुरू केलं आहे. काही कॅम्प देखील लावले जात आहेत. त्यामार्फतदेखील तुम्ही केवायसी करू शकता. मात्र त्याची योग्य माहिती काढून मगच तिथे केवायसी करा. नाहीतर असंच कुणालाही तुमची माहिती देऊ नका. त्यामुळे तुमचं खातं रिकामं होण्याचा धोका आहे हे विसरु नका. जन धन खात्याच्या री-केवायसी अंतर्गत, खातेधारक त्यांच्या वैयक्तिक तपशीलांमध्ये देखील बदल करू शकतात. जसे की पत्ता बदलणे किंवा इतर कोणतीही माहिती.
advertisement
कोणते कागदपत्र लागणार?
जन धन खात्याच्या री-केवायसीसाठी कागदपत्रे जर योग्य नसतील तर तुमचं काम होणार नाही. त्यासाठी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आवश्यक असेल. या कागदपत्रांद्वारे तुम्हाला तुमचा पत्ता पुरावा देखील द्यावा लागेल.
मराठी बातम्या/मनी/
Jan dhan yojana KYC: तुमच्याकडे फक्त 25 दिवस, आताच करा हे काम नाहीतर बंद होणार Saving Account
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement