Share Market Prediction: शेअर बाजारात 'विनाशाचे' संकेत, मार्केट भयानक कोसळण्याचा इशारा; गुंतवणूकदारांनो संकटासाठी तयार राहा, RBI गव्हर्नरचा गंभीर इशारा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market: RBI गव्हर्नर मल्होत्रा यांनी जागतिक शेअर बाजारांना मोठा इशारा दिला. उच्च कर्ज आणि टेक शेअर्सवर अवलंबून असलेले बाजार कधीही कोसळू शकतात, गुंतवणूकदारांनी सोन्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, भारत येत्या काही वर्षांत 7 ते 8 टक्के विकास दर कायम ठेवू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की- RBI चे पहिले उद्दिष्ट महागाईवर नियंत्रण ठेवणे आहे. परंतु विकासालाही तेवढेच महत्त्व दिले जाते. अलीकडेच RBI ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी GDP वाढीचा अंदाज वाढवून 6.8 टक्के केला आहे. जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत स्थितीचे संकेत देतो. दुसरीकडे टेक-आधारित जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये येत्या काळात घसरण दिसू शकते. जो सोन्या-चांदीच्या विक्रमी वाढलेल्या किमतीतूनही दिसून येतो.
advertisement
महागाईचे लक्ष्य आणि RBI ची भूमिका
RBI सध्या महागाईचे लक्ष्य निश्चित करणाऱ्या फ्रेमवर्कचा आढावा घेत आहे. सध्या हे फ्रेमवर्क ४ टक्के (+-२%) महागाईचे लक्ष्य ठेवते आणि दर पाच वर्षांनी त्याचा आढावा घेतला जातो. भारताने RBI च्या स्वातंत्र्यामध्ये आणि उत्तरदायित्वात (independence and accountability) चांगला समतोल राखला आहे. कोविड, रशिया-युक्रेन युद्ध आणि पुरवठा साखळीतील अडथळे (supply chain shocks) यांसारख्या आव्हानांना तोंड देऊनही RBI ने फेब्रुवारी २०२५ पर्यंत महागाईला पुन्हा ४ टक्क्यांच्या लक्ष्यावर आणण्यात यश मिळवले आहे, असे मल्होत्रा यांनी सांगितले. ते दिल्लीतील कौटिल्य आर्थिक परिषदेत बोलत होते.
advertisement
जागतिक आव्हाने आणि बाजाराची चिंता
RBI गव्हर्नर म्हणाले की- गेल्या पाच वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कठीण राहिले. कारण पुरवठा साखळीतील व्यत्यय, हवामानाचा फटका आणि कमोडिटी किमतींमधील वाढ यामुळे अनेक देशांमध्ये महागाई वाढली. त्यांनी इशारा दिला की, जगभरातील उच्च कर्जाची पातळी आणि तंत्रज्ञान शेअर्सवर अवलंबून असलेले बाजार कोणत्याही क्षणी घसरणीला सामोरे जाऊ शकतात. तसेच अमेरिकेचे वाढते टॅरिफ (Tariffs) आणि मंद जागतिक वाढीमुळे (Slow Global Growth) सर्व अर्थव्यवस्थांवर दबाव येऊ शकतो.
advertisement
भारताची स्थिती आणि पुढील मार्ग
भारताची मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक स्थितीच (Macroeconomic Position) त्याला उर्वरित जगापेक्षा वेगळी ठरवते. कमी महागाई, नियंत्रित चालू खाते तूट (Current Account Deficit - CAD), मजबूत कॉर्पोरेट ताळेबंद (Corporate Balance Sheet) आणि उच्च परकीय चलन साठा (Forex Reserves) यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळाली आहे.
advertisement
ते म्हणाले की- आजच्या अस्थिर जागतिक वातावरणात भारत एका 'अँकर इकॉनॉमी' (Anchor Economy) प्रमाणे उभा राहिला आहे. त्याच वेळी, त्यांनी हेही जोडले की सोन्याच्या किमतीतील वाढ ही जगातील अनिश्चिततेचे संकेत आहे आणि गुंतवणूकदारांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 9:00 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market Prediction: शेअर बाजारात 'विनाशाचे' संकेत, मार्केट भयानक कोसळण्याचा इशारा; गुंतवणूकदारांनो संकटासाठी तयार राहा, RBI गव्हर्नरचा गंभीर इशारा