ICICI, HDFC ते SBI…बँकेत किती मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, न ठेवल्यास किती दंड बसतो?

Last Updated:

देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने आपल्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.

News18
News18
पूर्वी बँकांमध्ये कमी रक्कम ठेवली तरी चालायचं, मात्र आता मिनिमम बॅलन्सचे नियम कठोर केले आहेत. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने आपल्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांनुसार, आता शहरी भागातील ग्राहकांना बचत खात्यात किमान 50,000 शिल्लक ठेवावी लागणार आहे. हा निर्णय नोकरी करणाऱ्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
ICICI बँकेने बचत खात्यांच्या किमान शिल्लक मर्यादेत वाढ केली आहे. नव्या नियमानुसार शहरी भागातील ग्राहकांसाठी मिनिमम बॅलन्स हा 10 हजार रुपयांवरुन थेट 50 हजार रुपये करण्यात आला आहे. पूर्वी खासगी बँकांना खातं उघडताना मिनिमम बॅलन्स 10 हजार ठेवणं बंधनकारक होतं. ती रक्कम वाढवण्यात आली आहे. निम शहरी भागात ही मर्यादा 5000 रुपयांवरुन थेट 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
ICICI बँकेने ग्रामीण भागातील मिनिमम बॅलन्सची मर्यादा 5000 रुपयांवरुन थेट 10 हजार रुपये केली आहे. जर एखाद्या खातेधारकाने ही किमान शिल्लक राखली नाही, तर त्यांना दंड भरावा लागेल. नवीन नियमांनुसार, कमी पडलेल्या रकमेवर 6% आणि जास्तीत जास्त 500 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल.एकिकडे ICICI बँक किमान शिल्लक मर्यादेत वाढ करत असताना, दुसरीकडे देशातील काही मोठ्या बँकांनी आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
advertisement
स्टेट बँक ऑफ इंडियाने 2020 मध्ये SBI ने शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील बचत खात्यांसाठी किमान शिल्लक ठेवण्याची अट पूर्णपणे रद्द केली. यामुळे लाखो खातेधारकांना मोठा फायदा झाला आहे. पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी देखील किमान शिल्लक न राखल्याबद्दल आकारला जाणारा दंड पूर्णपणे माफ केला.
advertisement
एचडीएफसी बँक ही ICICI नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेने शहरी भागातील ग्राहकांसाठी 25000 रुपये मिनिमम बॅलन्स आणि ग्रामीण भागासाठी 2500 रुपये किमान शिल्लक रक्कम खात्यावर ठेवणं आवश्यक आहे. युनियन बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये शहरी भागासाठी 1000 आणि ग्रामीण भागासाठी 250 किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
ICICI, HDFC ते SBI…बँकेत किती मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, न ठेवल्यास किती दंड बसतो?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement