Stocks To Buy : नवीन वर्षापूर्वी बक्कळ पैसा कमवायचाय? बेस्ट ठरु शकतात हे शेअर, एक्सपर्टचा सल्ला
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
यूपीएल, टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि एनटीपीसीचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात सर्वांत वेगानं वाढणाऱ्या शेअर्सच्या यादीत समाविष्ट होते.
नवी दिल्ली : संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान मंगळवारी (26 डिसेंबर) भारतीय शेअर बाजाराची स्थिती संमिश्र होती. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी लाल फितीत ओपन झाले. निफ्टीची स्थिती बरी होती. मंगळवारी बँक निफ्टी 28 अंकांच्या किरकोळ वाढीसह 47,519.80 वर उघडला. सेन्सेक्स 31.80 अंकांनी घसरून 71,075.16 वर ओपन झाला. निफ्टी 3.20 अंकांची अत्यंत किरकोळ घसरण दिसली. निफ्टी 31,346.20 च्या स्तरावर उघडला. बाजार उघडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तीनही प्रमुख निर्देशांक ग्रीन साइनमध्ये व्यवहार करताना दिसले.
यूपीएल, टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि एनटीपीसीचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात सर्वांत वेगानं वाढणाऱ्या शेअर्सच्या यादीत समाविष्ट होते. त्यांच्यात 1.16 ते 1.41 टक्क्यांनी वाढ झाली. या कालावधीत निफ्टीच्या कमकुवत शेअर्सच्या यादीत इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक, टेक महिंद्रा आणि टीसीएसच्या शेअर्सचा समावेश करण्यात आला. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 0.59 टक्के ते 2.17 टक्क्यांनी घसरण झाली.
advertisement
आज `सीएनबीसी आवाज`वर बाजार तज्ज्ञांनी तांत्रिक चार्टच्या आधारे सहा शेअर्सवर त्यांचं मत व्यक्त केले आहे. त्यात सिंजिनी, डीएलएफ, गोदरेज कन्झ्युम, एशियन पेंट्स आणि एसआरएफ यांचा समावेश आहे.
तज्ज्ञांचे आवडते शेअर्स
advertisement
प्रकाश गाबांच्या पसंतीचा शेअर
शेअर - सिंजिनी
मत - खरेदी करा
टार्गेट - 720/740 रुपये प्रति शेअर
स्टॉप लॉस - 698 रुपये प्रति शेअर
मानस जयस्वाल यांच्या पसंतीचा शेअर
शेअर-डीएलएफ
मत - खरेदी करा
टार्गेट -735 रुपये प्रति शेअर
स्टॉप लॉस - 704 रुपये प्रति शेअर
राजेश सातपुते यांच्या पसंतीचा शेअर
शेअर - गोदरेज कन्झ्युमर
advertisement
मत - खरेदी करा
टार्गेट - 1120/1150 रुपये प्रति शेअर
स्टॉप लॉस - 1050 रुपये प्रति शेअर
कविता जैन यांच्या पसंतीचा शेअर
शेअर - एशियन पेंट्स
मत - खरेदी करा
टार्गेट - 3380/3400 रुपये प्रति शेअर
स्टॉप लॉस -3310 रुपये प्रति शेअर
आशिष बाहेतींच्या पसंतीचा शेअर
शेअर- एसआरएफ
मत - खरेदी करा
advertisement
टार्गेट - 2490 रुपये प्रति शेअर
स्टॉप लॉस - 2425 रुपये प्रति शेअर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 27, 2023 11:38 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Stocks To Buy : नवीन वर्षापूर्वी बक्कळ पैसा कमवायचाय? बेस्ट ठरु शकतात हे शेअर, एक्सपर्टचा सल्ला