Share Market Prediction: एका शेअरची किंमत होणार 9 हजार 500; टार्गेटने बाजारात खळबळ, आजचा भाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
TCS Share : शेअर बाजारात एका कंपनीच्या शेअरने मोठी उसळी घेण्याची चिन्हं दिसत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या 9,500 रुपयांच्या टार्गेटमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे शेअर्स यावर्षी अत्यंत खराब कामगिरी करत आहेत. टीसीएसचा स्टॉक मंगळवारी १ टक्क्यांहून अधिक वाढला असला तरी २०२५ मध्ये आतापर्यंत तो २५ टक्क्यांनी घसरला आहे. 'मिंट'मधील एका लेखानुसार, याच कालावधीत निफ्टी आयटी इंडेक्समध्ये केवळ १७ टक्के घसरण झाली आहे. याचा अर्थ टीसीएसने आयटी स्टॉकच्या सरासरी घसरणीपेक्षाही जास्त निराशा केली आहे. मात्र या घसरणीमुळे हा स्टॉक खरेदीसाठी आकर्षक बनला आहे का? या अहवालानुसार टीसीएसचा शेअर पुढील ५ वर्षांत आजची गुंतवणूक जवळपास तिप्पट करू शकतो.
advertisement
विश्वास कायम
बाजार तज्ज्ञांचा टीसीएसवर विश्वास कायम आहे. 'यश वेल्थ'चे संचालक अनुज गुप्ता आणि 'एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज'च्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक सीमा श्रीवास्तव यांचे मत आहे की- कंपनीचे मजबूत फंडामेंटल्स आणि जास्त मार्जिनचा व्यवसाय मॉडेल दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुरक्षित आहे.
advertisement
अनुज गुप्ता म्हणतात की, टीसीएसने सातत्याने महसूल आणि नफ्यात वाढ दाखवली आहे. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या उच्च-वाढीच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. त्यांच्या मते जेव्हाही टीसीएसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होते, तेव्हा ती खरेदीची संधी मानली पाहिजे. यासाठी २,६२० चा स्टॉपलॉस ठेवणे फायदेशीर ठरेल.
advertisement
सरासरीपेक्षा अधिक मार्जिन
सीमा श्रीवास्तव यांच्या मते- टीसीएसचा महसूल जरी वार्षिक आधारावर १.३% ने वाढला असला, तरी कंपनीने २४.५% चा ऑपरेटिंग मार्जिन आणि २०.१% चा निव्वळ मार्जिन मिळवला आहे. जो उद्योग सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. हे कंपनीचे डिजिटल सेवा, सायबर सुरक्षा आणि जागतिक भागीदारीवर असलेले लक्ष दर्शवते. अलीकडेच कंपनीने आयबीएम आणि व्हर्जिन अटलांटिकसारख्या कंपन्यांसोबत आपली भागीदारी वाढवली आहे आणि DigiBOLT™ सारखे नवीन प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत.
advertisement
फ्री कॅश फ्लो आणि स्थिरता
टीसीएसची मजबूत 'फ्री कॅश फ्लो' निर्मिती ही गुंतवणूकदारांसाठी आकर्षक आहे. जे गुंतवणूकदार भांडवलाचे संरक्षण, स्थिर परतावा आणि दीर्घकाळ 'कंपाउंडिंग'वर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी टीसीएस आजही एक पसंतीचा स्टॉक आहे.
advertisement
शेअर किंमतीचे लक्ष्य (Share Price Target)
विश्लेषकांच्या मते एआय-आधारित अंदाज आणि बाजारातील मूल्यांकनानुसार टीसीएसच्या शेअरमध्ये आगामी वर्षांत मोठी वाढ होऊ शकते.
अल्प-मुदतीचे (१२ महिने):
advertisement
सरासरी ३,७१५ ते ३,९३०
उच्च ४,५०० ते ४,८४०,
तर कमीतकमी २,६२० ते २,८७८.
दीर्घ-मुदतीचे:
२०२६: ५,२०० ते ५,८००
२०२७: ६,००० ते ६,७००
२०२८: ६,८०० ते ७,५००
२०२९: ७,६०० ते ८,४००
२०३०: ८,५०० ते ९,५०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Disclaimer: वरील माहिती तज्ञांनी व्यक्त केलेले विचार आणि गुंतवणूक टिप्स त्यांचे स्वतःचे आहेत. वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाचे नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 9:16 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market Prediction: एका शेअरची किंमत होणार 9 हजार 500; टार्गेटने बाजारात खळबळ, आजचा भाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल