advertisement

Pirvate Jet : प्रायव्हेट जेटचं भाडं किती? एका ट्रिपसाठी किती खर्च येतो, सरकारचे नियम काय सांगतात? वाचा

Last Updated:

तुम्हाला माहिती आहे का? हे विमान विकत घेणे जितके आव्हानात्मक आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण आहे ते टिकवून ठेवणे. आज आपण या 'उडत्या महाला'च्या किंमतीपासून ते त्याच्या खरेदीच्या नियमांपर्यंतची सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपल्या प्रत्येकाचे काही ना काही एक स्वप्न नक्कीच असते, कोणाचे अलिशान बंगला बांधण्याचे, तर कोणाची महागडी कार घेण्याचे. पण जेव्हा आपण 'अफाट श्रीमंती' असा शब्द वापरतो, तेव्हा डोळ्यासमोर येते ते म्हणजे निळ्या आकाशात झेपावणारे एक पांढरे-शुभ्र 'प्रायव्हेट जेट'. सिनेमांमध्ये जेव्हा एखादा बिझनेस टायकून किंवा सुपरस्टार स्वतःच्या विमानातून दिमाखात उतरतो, तेव्हा ते दृश्य पाहून अनेकदा असं वाटतं की वाह भाई एन्ट्री असावी तर अशी आणि आपण पण कधीकधी अशी एन्ट्री करावी.
प्रायव्हेट जेट म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नाही, तर ते यश आणि लक्झरीचे सर्वोच्च शिखर मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? हे विमान विकत घेणे जितके आव्हानात्मक आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण आहे ते टिकवून ठेवणे. आज आपण या 'उडत्या महाला'च्या किंमतीपासून ते त्याच्या खरेदीच्या नियमांपर्यंतची सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
advertisement
आकाशातील लक्झरी: प्रायव्हेट जेटची किंमत, देखभाल आणि ते विकत घेण्याचे नियम
1. एका प्रायव्हेट जेटची किंमत नक्की किती असते?
विमानाची किंमत ही त्याच्या इंजिनची क्षमता, आतील सजावट (Interior) आणि ते किती लांबचा प्रवास करू शकते (Range) यावर ठरते.
लाईट जेट्स (Light Jets): यामध्ये 4 ते 6 लोक बसू शकतात. याची किंमत साधारण 15 कोटी ते 40 कोटी रुपयांपर्यंत असते. ही विमाने कमी अंतराच्या प्रवासासाठी उत्तम असतात.
advertisement
मिड-साईज जेट्स (Mid-size Jets): यामध्ये 8 ते 10 लोक बसू शकतात आणि सोयी-सुविधाही जास्त असतात. याची किंमत 60 कोटी ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान असते.
लार्ज/हेवी जेट्स (Large Jets): हे म्हणजे चालते-फिरते महालच असतात. यामध्ये बेडरूम, मीटिंग रूम आणि किचन असते. यांची किंमत 300 कोटींपासून ते 800 कोटी रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते.
advertisement
2. खरेदी कोण करू शकतं? आणि काय आहेत नियम?
प्रायव्हेट जेट खरेदी करण्यासाठी केवळ पैसा असून चालत नाही, तर भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) कडक नियम पाळावे लागतात.
सुरक्षा क्लिअरन्स: विमान घेणाऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला गृह मंत्रालयाकडून 'सिक्युरिटी क्लिअरन्स' मिळवणे अनिवार्य आहे.
विमान खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर परकीय चलन वापरले जाते, त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करावे लागते.
advertisement
जर तुम्ही स्वतःसाठी विमान घेत असाल तर तुम्हाला 'नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर' म्हणून नोंदणी करावी लागते.
पात्रता: कोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती किंवा भारतात नोंदणीकृत कंपनी हे विमान खरेदी करू शकते.
3. एका वेळेच्या प्रवासासाठी नक्की किती खर्च येतो?
विमान हवेत असो वा जमिनीवर, त्याचा खर्च कधीच थांबत नाही. तुम्ही एकदा प्रवास करायचा ठरवला तर खालील खर्च डोळ्यासमोर ठेवावे लागतात:
advertisement
इंधन (ATF): विमानाचे इंधन अत्यंत महाग असते. एका लहान विमानाच्या एका तासाच्या प्रवासासाठी साधारण 50 हजार ते 1 लाखाचे इंधन लागते.
लँडिंग आणि पार्किंग फी: कोणत्याही विमानतळावर विमान उतरवण्यासाठी 'लँडिंग चार्जेस' द्यावे लागतात. जर विमान तिथे रात्री पार्क केले, तर त्याचे 'पार्किंग चार्जेस' वेगळे असतात.
ग्राउंड हँडलिंग: विमानाची साफसफाई आणि प्रवाशांची सोय पाहणाऱ्या टीमला 50 हजार ते 1 लाख रुपये द्यावे लागतात.
advertisement
जर तुम्ही भाड्याने विमान घेतले, तर एका तासाला 1.5 लाख ते 8 लाख रुपये मोजावे लागतात.
4. खिशाला कात्री लावणारा 'मेंटेनन्स' खर्च
प्रायव्हेट जेट घेणं सोपं आहे, पण ते सांभाळणे कठीण आहे, असं का? असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर खालील मुद्यांवरुन तुम्हाला हे लक्षाक येईल.
एका जेटसाठी किमान दोन अनुभवी पायलट आणि केबिन क्रू लागतो. त्यांचा पगार, प्रशिक्षण आणि हॉटेल स्टेचा खर्च वार्षिक करोडोंमध्ये जातो.
विमा (Insurance): विमानाचा विमा उतरवणे अत्यंत महागडे असते. विमानाची किंमत जितकी जास्त, तितका विम्याचा हप्ता (Premium) मोठा.
हँगर भाडे: विमान उभे करण्यासाठी विमानतळावर खास जागा (Hanger) भाड्याने घ्यावी लागते. याचे महिन्याचे भाडे लाखो रुपये असते.
5. विमान खरेदी कुठून करायची?
विमान घेण्यासाठी कारसारखे शोरूम्स नसतात. यासाठी एअरक्राफ्ट ब्रोकर किंवा एव्हिएशन मॅनेजमेंट कंपन्यांची मदत घेतली जाते. 'गल्फस्ट्रीम' (Gulfstream), 'बॉम्बार्डियर' (Bombardier) आणि 'दसॉल्ट' (Dassault) यांसारख्या मोठ्या कंपन्या थेट कंपन्यांशी संपर्क साधून किंवा एजंटमार्फत नवीन विमाने विकतात. सेकंड हँड विमानांसाठी 'कंट्रोलर' (Controller) सारख्या जागतिक वेबसाईटचा वापर केला जातो.
प्रायव्हेट जेट असणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. मात्र, वेळेची बचत आणि गोपनीयतेसाठी मोठे उद्योगपती आणि सेलिब्रेटी हा खर्च आनंदाने सोसतात. तुम्हाला जर विमानाने प्रवास करायचा असेल तर स्वतःचे विमान घेण्यापेक्षा आजकाल 'चार्टर' करणे हा अधिक स्वस्त पर्याय मानला जातो. यासाठी तासाला 1.5 लाख ते 8 लाख रुपये मोजावे लागतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Pirvate Jet : प्रायव्हेट जेटचं भाडं किती? एका ट्रिपसाठी किती खर्च येतो, सरकारचे नियम काय सांगतात? वाचा
Next Article
advertisement
Ajit Pawar Plane Crash: अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स, पण पायलटने....; Aviation Ministryची पहिली मोठी प्रतिक्रिया
अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स, पण पायलटने....
  • Ajit Pawar Plane Crash

  • अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स

  • पण पायलटने....

View All
advertisement