Mumbai Fire: अंधेरीच्या आगीत 73 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील एका निवासी इमारतीत लागलेल्या आगीमध्ये 73 वर्षाच्या महिलेचा होरपळून मृत्यू झालाय.
मुंबई: मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील एका निवासी इमारतीत लागलेल्या आगीमध्ये 73 वर्षाच्या महिलेचा होरपळून मृत्यू झालाय. 17 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास इमारतीला आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाने एका तासाच्या आत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आगीचे कारण शोधण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली.
बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील लोखंडवाला ओशिवरा येथील हाय पॉइंट हॉटेलजवळील सात मजली ब्रीझ हाऊसिंग सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सकाळी 11:15 वाजता आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि उपकरणे घटनास्थळी दाखल झाली आणि एका तासाच्या आत आग आटोक्यात आणण्यात आली.
"आग 402 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये लागली, जिथे एकटीच राहणारी एक ज्येष्ठ महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्यांचा जीव गुदमरल्यामुळे मृत्यू झाला," असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. आगीचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आणि नमुने गोळा केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी हिरू चेतलानी (73) ह्यांना मृत घोषित केले.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 10:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire: अंधेरीच्या आगीत 73 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट










