Ashadhi Ekadashi 2025: आषाढीआधी झेंडूला सोन्याचा भाव! दादर मार्केटमध्ये शेवंती महागली, चाफा 140 रुपयांवर!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पूजा केली जाते. त्यामुळे फूल बाजारात तेजी असून दादर फूल मार्केटमध्ये गर्दी होत आहे.
मुंबई: यंदाची आषाढी एकादशी येत्या रविवारी, म्हणजेच 6 जुलै रोजी साजरी होणार आहे. या पवित्र दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर विठ्ठल नामस्मरणात भक्त दंग होतात. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांपासून ते घराघरांतील पूजा करणाऱ्या भक्तांपर्यंत, सर्वत्र एक वेगळीच भक्तिभावाची लहर पाहायला मिळते.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर फुल मार्केट सुद्धा विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगलेलं दिसत आहे. एकादशीच्या आदल्या दिवसांपासूनच येथे खरेदीसाठी गर्दी उसळते. यावर्षीही मार्केटमध्ये झेंडू, शेवंती, चाफा, तुळशी यांसारख्या पूजेच्या फुलांना आणि पत्रांना मोठी मागणी आहे.
यंदाचे फुलांचे दर (होलसेल):
लाल व पिवळा झेंडू: 80 रुपये प्रति किलो
advertisement
शेवंती: 80 रुपये प्रति किलो
चाफा (फ्रेंजिसिपानी): 140 रुपये प्रति शेकडा (100फुलं)
तुळशीपत्र: 20 प्रति जुडी
विठ्ठलाची पूजा करताना तुळशीपत्र अर्पण करणं अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे तुळशीची जुडी खरेदी करण्यासाठी ग्राहक विशेष गर्दी करत आहेत. काही व्यापाऱ्यांच्या मते, मागणीमुळे एकादशीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
दादर मार्केटमध्ये सकाळपासूनच भाविक आणि विक्रेत्यांची वर्दळ दिसून येते. अनेक जण पूजेसाठी लागणारी फुलं मोठ्या प्रमाणावर विकत घेत आहेत. काहीजण घरच्या पूजेसाठी, तर काहीजण मंदिरासाठी अथवा सामाजिक पूजांसाठी फुलं खरेदी करत आहेत.
एकादशीचा सण आणि भक्तीचा उत्साह
आषाढी एकादशी ही वारकऱ्यांचा आणि विठ्ठलभक्तांचा महत्त्वाचा सण. घराघरात विठ्ठल-रखुमाईची पूजा केली जाते. सकाळी उपवास, अभिषेक, भजन, आणि नामस्मरण यांचा कार्यक्रम पार पडतो. त्यामुळे पूजेसाठी लागणारी फुलं आणि पत्रं यांची महत्त्वाची भूमिका असते. फुलांच्या या रंगीबेरंगी बाजारातही एक वेगळीच श्रद्धेची सजावट पाहायला मिळते, जिथे सुगंध फक्त फुलांचा नाही, तर भक्तीचा असतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 04, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीआधी झेंडूला सोन्याचा भाव! दादर मार्केटमध्ये शेवंती महागली, चाफा 140 रुपयांवर!