हिंदी सक्तीआधीच विद्यार्थी गायब, शाळा बंद! मुंबईतून आली धक्कादायक आकडेवारी, नेमकं काय घडतंय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Education: हिंदी सक्तीवरून राज्यात वातावरण तापलं असून अशातच मुंबईतून एक धक्कादायक आकडेवारी पुढे आलीये. महापालिका शाळेतील विद्यार्थी संख्येत मोठी घट झालीये.
मुंबई: राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीवरून वातावरण तापलं आहे. अशातच मुंबईतून धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांचा टक्का घसरत असून 13 वर्षात हिंदी माध्यमातील 47 टक्के विद्यार्थी घटले आहे. तसेच हिंदीच्या 19 शाळादेखील बंद झाल्या आहेत. तर तब्बल एक हजार 212 शिक्षक देखील कमी झाल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
मुंबईत 2012-13 ते 2024-25 या 13 वर्षांत पालिका शाळांमधील हिंदी शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 2012-13 मध्ये मुंबईत हिंदीच्या 234 शाळा आणि त्यात 1 लाख 21 हजार 380 विद्यार्थी आणि 3 हजार 133 शिकक्षक होते. मात्र, 2024-25 या वर्षात 216 शाळा, 64 हजार 549 विद्यार्थी आणि 1921 शिक्षक असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे 13 वर्षांच्या काळात विद्यार्थी 47 टक्के तर शिक्षकांच्या प्रमाणात 40 टक्क्यांची घट झाली आहे.
advertisement
मराठी शाळानंतर हिंदी शाळाही बंद
मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या घटत असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. आता हिंदी शाळांबाबतही तोच प्रकार घडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळा आणि तेथील शिक्षण व्यवस्थेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच विद्यार्थी संख्येत मोठी घट होत असताना महापालिका आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 27, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
हिंदी सक्तीआधीच विद्यार्थी गायब, शाळा बंद! मुंबईतून आली धक्कादायक आकडेवारी, नेमकं काय घडतंय?