फडणवीस सरकारचा महामुंबईसाठी मोठा निर्णय, उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58 हजार 754 कोटी मंजूर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
55.12 किमी लांबीच्या प्रकल्पास शासन मान्यता मिळाली आहे. हा सागरी सेतू पुढे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस मार्गे वाढवण बंदरापर्यंत जोडण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागात वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने उत्तन ते विरार असा सागरी सेतू उभारला जात आहे. या प्रकल्पासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे काम सादर करण्यात आले असून उत्तन ते विरार सागरी सेतू साठी तब्बल 58 हजार 754 कोटी रुपयांना शासन मान्यता फडणवीस सरकारने दिली आहे. एमएमआरडीएला प्रकल्प अंमलबजावणीस शासन मान्यता देणारा निर्णय जारी करण्यात आला आहे.
वर्सोवा ते विरार हा सेतू सुरुवातीला उभारण्याची योजना होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 32 हजार कोटी रुपयांत हा पूल उभारणीचं नियोजन केलं होतं पण नंतर हा पूल, प्रकल्प उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सोपवण्यात आला. त्यानंतर 32 हजार कोटीवरुन या पुलाचा खर्च 63 हजार 450 कोटी रुपयांचा झाला.
advertisement
55.12 किमी लांबीच्या प्रकल्पास शासन मान्यता
खर्च वाढल्यामुळे एमएमआरडीएने या खर्च वाढीचं स्वतंत्रपणे पुनरावलोकन करत अंतीम आराखडा सादर करण्यात आला. त्यानंतर एमएमआरडीएला प्रकल्प अंमलबजावणीस शासन मान्यता देणारा निर्णय जारी झाला आहे. 24.35 किमी लांबीचा उत्तन-विरार मुख्य सागरी सेतू असणार आहे. सागरी सेतूला 30.77 किमीच्या जोडरस्त्यांनी जोडणार आहे. एकूण 55.12 किमी लांबीच्या प्रकल्पास शासन मान्यता मिळाली आहे. हा सागरी सेतू पुढे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस मार्गे वाढवण बंदरापर्यंत जोडण्यात येणार आहे.
advertisement
कसा आहे प्रकल्प?
पहिल्या टप्प्याची एकूण लांबी ही 55.12 किलोमीटरची असेल. यामध्ये सागरी सेतू आणि जोड रस्त्यांचा देखील समावेश आहे. उत्तन ते विरार सागरी सेतू एकूण 24.35 किलोमीटर लांबीचा असेल. उत्तन जोडरस्ता 9.32 किलोमीटर, वसई जोडरस्ता 2.5 किमी, विरार जोडरस्ता 18.95 किलोमीटर लांबीचा असेल.
रम्यान, कॉरिडॉरमुळे दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ कमी लागणार असून वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगात देखील वैद्यकीय मदत वेळेत पोहोचवता येणार आहे.
advertisement
उत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत हा सेतू वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 9:14 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
फडणवीस सरकारचा महामुंबईसाठी मोठा निर्णय, उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58 हजार 754 कोटी मंजूर


