हातात मोबाइल असला की पुरे! महाराष्ट्र बोर्डाची आता डिजिटल सुविधा; सर्व सर्टिफिकेट मिळवा एका क्लिकवर

Last Updated:

Maharashtra Board online certificates : महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठी सुविधा सुरू केली आहे. दहावी-बारावीची डुप्लिकेट मार्कशीट, स्थलांतर आणि प्रोविजनल सर्टिफिकेट आता पूर्णपणे ऑनलाइन मिळणार आहेत.

News18
News18
मुंबई : दहावी-बारावीची मार्कशीट आणि इतर सर्टिफिकेट विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि महत्त्वाच्या कामांसाठी खूप गरजेची असतात. पण ही कागदपत्रे हरवली तर किंवा त्यात काही बदल करायचा असेल तर विद्यार्थ्यांना आधी बोर्डाच्या कार्यालयात वारंवार जावं लागायचं. त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असे. ही प्रक्रिया अनेकांना गुंतागुंतीची आणि वेळखाऊ वाटत होती.
बोर्डाच्या फेर्‍या संपल्या, डुप्लिकेट मार्कशीट मिळणार थेट ऑनलाइन
आता विद्यार्थ्यांना यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले की बोर्डाने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाइट 'www.mahahsscboard.in' वरून आता विद्यार्थी घरबसल्या विविध सर्टिफिकेट मिळवू शकतात. यामध्ये डुप्लिकेट मार्कशीट, डुप्लिकेट सर्टिफिकेट, प्रोविजनल सर्टिफिकेट आणि माइग्रेशन सर्टिफिकेटचा समावेश आहे.
advertisement
पूर्वी या सर्टिफिकेटसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जात होते. अनेकदा विद्यार्थ्यांना अर्जासाठीसुद्धा फी भरावी लागत होती. पण आता मोठा बदल करत मंडळाने सर्व स्वतंत्र शुल्क रद्द केले आहेत. आता कोणतेही सर्टिफिकेट हवे असल्यास फक्त 500 रुपये प्रति प्रमाणपत्र एवढेच शुल्क भरावे लागेल. त्यासाठी वेगळा अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे 1990 सालापासून आतापर्यंतचे सर्व डेटा प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे 1990 नंतरच्या कोणत्याही विद्यार्थ्याने सर्टिफिकेट मागितले तर त्याची सॉफ्ट कॉपी तत्काळ उपलब्ध होईल. विद्यार्थी आधार क्रमांकावर आधारित ओटीपी प्रणाली वापरून थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज मिळाल्यानंतर संबंधित विभागीय मंडळाला फक्त तीन दिवसांत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.
advertisement
जर विद्यार्थ्याने कागदपत्रे पोस्टाने मागवली असतील तर ती स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठवली जाणार आहेत. या नवीन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची वेळ, पैसे आणि अनावश्यक त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
हातात मोबाइल असला की पुरे! महाराष्ट्र बोर्डाची आता डिजिटल सुविधा; सर्व सर्टिफिकेट मिळवा एका क्लिकवर
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement