Maharashtra Elections : जागा वाटपावर तिढा, शहा-राऊतांमध्ये चर्चा? काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Congress: गृहमंत्री अमित शहा आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात चर्चा सुरू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
मुंबई/नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावरुन तिढा कायम आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटात काही जागांवरून सुरू असलेला तिढा अजूनही सुटला नाही. तर, दुसरीकडे भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात चर्चा सुरू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. काँग्रेससोबत चर्चा फिस्कटल्यानंतर ठाकरे गटा प्लान बीवर काम करत असल्याचे सांगण्यात आले. यावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वडेट्टीवार यांनी काय म्हटले?
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पर्यायाने महाविकास आघाडीत भांडणे लावण्याचा प्रयत्न होत आहे. सध्या समोर येत असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. शिवसेना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत आणि आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
advertisement
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाच्या ताठर भूमिकेबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण, या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. आमची फक्त उमेदवारांच्या यादीबाबत चर्चा झाली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे काही जागांवर वाद निर्माण झाला आहे. या वादांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न तिन्ही पक्षांकडून सुरू आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली.
advertisement
इतर महत्त्वाची बातमी:
view comments
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Oct 21, 2024 2:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections : जागा वाटपावर तिढा, शहा-राऊतांमध्ये चर्चा? काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया...









