Maharashtra Weather : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, 30 नोव्हेंबर : मागील आठवड्यात राज्यातीन अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतमालाचे अतोनात नुकसान केले. अशातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पुढील 24 तास राज्यात पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज आहे. राज्यात विविध ठिकाणी आज मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
कशी आहे पावसाची स्थिती?
30 नोव्हेंबर - कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काठी ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. उद्या 1 डिसेंबर रोजीही अशीच परिस्थिती राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
advertisement
A WML (गहरा कमदवाब क्षेत्र)over SE-BoB likely intensify into D(डिप्रेशन )in same area in next 24hrs,into CS(चक्रवात)over SW-BoB near 3 Dec. In between isol wet spell with thundery activity likely over महाराष्ट्र for next 2days.4th onward partly cloudy sky likely. So NO ठंड now. pic.twitter.com/jns6aRRG60
— Anupam Kashyapi Never B Upset (@anupamkashyapi) November 30, 2023
advertisement
बळीराजाची चिंता वाढली
पुढील 24 तास विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पुढील 24 तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.
advertisement
22 जिल्ह्यांत तीन लाख 93 हजार 335 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
view commentsराज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे 22 जिल्ह्यांत तीन लाख 93 हजार 335 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अद्यापही नुकसानग्रस्त 10 हून अधिक जिल्ह्यांमधील पूर्ण आकडेवारी येणे बाकी असून साडेचार लाख हेक्टरहून अधिक शेतीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज मांडला गेला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने सहा जणांना मृत्यू झाला होता. तर 161 जनावरे दगावली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2023 10:47 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Weather : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता


