Shocking : मुलगी गाढ झोपेत, मध्यरात्री बाप आला अन् ब्लेडने गळा चिरला; जन्मदाता का उठला जिवावर?

Last Updated:

Dahisar Crime News : दहिसरमध्ये मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. दारूच्या व्यसनाधीन पित्याने झोपेत असलेल्या 14 वर्षीय मुलीचा गळा ब्लेडने चिरला तसेच पत्नीवरही हल्ला केला.

News18
News18
मुंबई : दहिसरमधील कोकणी पाडा परिसरात घडलेली ही घटना ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल अशी आहे. स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर झोपेत असताना ब्लेडने गळा चिरण्याचा वडिलांनी प्रयत्न केला आणि त्यात तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या पत्नीवरही त्याने हल्ला केला आहे. घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
रागाच्या भरात नराधम पित्याचं कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत सोनवळला (वय36) दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तो वारंवार कुटुंबाला त्रास देत होता. धक्कादायक म्हणजे त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने सतत तो तिला मारहाण, धमक्या देत असत, यामुळे राजश्रीने शेवटी वांद्रे कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली होती. पण याच गोष्टीने तो संतापलेला होता.
advertisement
नेकमं 'त्या' रात्री काय घडलं?
राजश्री नालासोपाऱ्यातून वकिलांकडून माहिती घेऊन घरी परतली होती, तेव्हा हनुमंतने तिची चौकशी करत घरात पुन्हा वाद सुरु केला पुन्हा वाद केला. त्यानंतर साधारण रात्री सव्वादोनच्या सुमारास मुलगी गाढ झोपलेली असताना हनुमंतने तिचा गळा ब्लेडने चिरला. अचानक गळ्याला जळजळ आणि वेदना झाल्याने मुलीचे डोळे उघडले आणि तिने आरडाओरड सुरू केली. तिला स्वतःच्या वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला हे पाहून तिला धक्का बसला.
advertisement
आईलाही वाचवताना मारहाण
मुलीचा ओरडा ऐकून आई राजश्री तिच्या मदतीला धावली पण हनुमंतचा संताप इतका वाढलेला होता की मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या पत्नीच्या पोटावरही त्याने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही राजश्रीने कशीबशी स्वतःला आणि मुलीला वाचवले. बाहेर असलेल्या नातेवाइकांनी त्यांची आरडाओरड ऐकून पोलिसांना तातडीने संपर्क साधला.
जखमी मायलेकींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दहिसर पोलिसांनी हनुमंतला घटनास्थळावरून ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : मुलगी गाढ झोपेत, मध्यरात्री बाप आला अन् ब्लेडने गळा चिरला; जन्मदाता का उठला जिवावर?
Next Article
advertisement
Maharashtra Local Body Election: जिल्हा परिषद निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट समोर
ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट
  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

View All
advertisement