Mumbai News: मुंबईकर सुस्साट! 30 मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटांत, इथं 300 कोटींचा पूल

Last Updated:

Mumbai News: सततच्या वाहतूककोंडीमुळे हैराण मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता 30 मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटांत होणार आहे.

Mumbai News: मुंबईतला प्रवास आणखी सुस्साट, 30Mumbai News: मुंबईतला प्रवास आणखी सुस्साट, 30 मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटांत, इथं 300 कोटींचा पूल मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटांत, इथं 300 कोटींचा पूल
Mumbai News: मुंबईतला प्रवास आणखी सुस्साट, 30Mumbai News: मुंबईतला प्रवास आणखी सुस्साट, 30 मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटांत, इथं 300 कोटींचा पूल मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटांत, इथं 300 कोटींचा पूल
मुंबई: वाहतूककोंडीने हैराण मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे. फिनिक्स मिल्स आणि कमला मिल्सकडे जाणाऱ्या सेनापती बापट मार्गाला लाला लजपतराय रोडच्या हाजी अली टोकाशी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी एक नवीन उन्नत रस्ता प्रस्तावित असून तो कोस्टल रोडला जोडणार आहे. विशेष म्हणजे या नव्या मार्गामुळे परळ, दादर, माटुंगा आणि माहीम या गर्दीच्या भागातून प्रवास करणारे लोक काही मिनिटांतच हाजी अली जंक्शनजवळील कोस्टल रोडवर पोहोचू शकतील.
मुंबई शहराच्या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा प्रस्तावित सहा-लेनचा उन्नत कॉरिडॉर महालक्ष्मी रेसकोर्सच्या काठावरून आणि एनएससीआय डोमजवळून जाईल. या प्रकल्पासाठी कोणत्याही भूसंपादनाची आवश्यकता नाही आणि बांधकामादरम्यान वाहतुकीचा प्रवाहही विस्कळीत होणार नाही, अशी माहिती शहरी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
कसा असेल मार्ग?
नवीन मार्ग लाला लजपतराय रोडवरील कोस्टल रोडच्या प्रवेशद्वाराजवळून सुरू होईल आणि रेस ट्रॅक आणि स्टेडियमच्या बाजूने मोकळ्या जागेतून जाईल. पुढे सेनापती बापट मार्गाच्या एमोसेस रोडच्या टोकाजवळ येईल. तेथून, मोटारचालकांना गोखले रोड, लेडी जमशेद रोड, भवानी शंकर रोड, एनएम जोशी मार्ग आणि पुढे सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, लोअर परळ आणि माहीम सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सहज प्रवेश मिळेल.
advertisement
300 कोटींचा खर्च
दरम्यान, प्रकल्पाचा अंतिम आराखडा अद्याप निश्चित झालेला नाही. तरीही 1.5 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरसाठी 250 ते 300 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. नवीन लिंकमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी घट होणार असून 30 मिनिटांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील कमी होईल.
सध्या हाजी अलीहून (तरदेव, पेडर रोड, भुलाभाई देसाई रोड किंवा कोस्टल रोड मार्गे) येणाऱ्या वाहतुकीला वरळी नाका (अ‍ॅनी बेझंट रोड किंवा पांडुरंग बुधकर मार्गे) मार्गे लांबून फेऱ्या माराव्या लागतात. नेहरू सायन्स सेंटर रोड, किंवा केशवराव खाडये मार्ग-डॉ. ई. मोझेस रोड, रेसकोर्सभोवती वळण घेऊन आणि दादर आणि परळहून दादर दक्षिणेकडे जाणारी वाहतूक त्याच मार्गाने करावी लागते.
advertisement
प्रस्ताव तयार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वयातून प्रस्ताव तयार केला आहे. अद्याप या प्रकल्पाला अंतिम स्वरूप आलेले नसले तरी लोकांना विस्थापित न करता, जमीन संपादन न करता प्रवासाचा वेळ कमी करण्याचे आणि गर्दी कमी करण्याचे आश्वासन दिल्याने या योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईच्या भविष्याकडे दूरदर्शी पाऊल
“हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाही; तर मुंबईच्या भविष्याकडे एक दूरदर्शी पाऊल आहे. मुंबई वाहतूक कोंडीमुक्त करणे आमचे ध्येय आहे. या सिग्नल-मुक्त कॉरिडॉरमुळे सुरळीत आणि सुस्साट प्रवास शक्य होईल. मुंबईकरांच्या वेळेचा आणि जागेचा आदर करणारा जलद, स्वच्छ एमएमआर बांधण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे शिंदे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईकर सुस्साट! 30 मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटांत, इथं 300 कोटींचा पूल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement