Mumbai BEST Fire : मुंबईत भरपावसात बेस्टच्या 'डबलडेकर'ला आग! धावत्या बसमधील अग्नितांडवाने प्रवासी हादरले
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
Mumbai News : आज, सकाळच्या सुमारास बेस्ट एसी डबलडेकर बसला आग लागल्याची घटना समोर आली. ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी बसला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला.
मुंबई: मुंबईत बेस्ट बसच्या तक्रारी संपता संपण्याची चिन्ह नाहीत. आधीच ताफ्यातील बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज, सकाळच्या सुमारास बेस्ट एसी डबलडेकर बसला आग लागल्याची घटना समोर आली. ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी बसला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला.
बेस्टची एसी डबलडेकर बस ए-138 या क्रमांकाच्या बसला आग लागली. आग लागल्याचे समजताच चालकाने बस थांबवली. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवासी बस बाहेर पडले. भाटिया बागेहून बॅकबे डेपोच्या दिशेने निघालेल्या एका इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. बस डाव्या बाजूच्या टायरजवळ असलेल्या हाय व्होल्टेज बॅटरीच्या ठिकाणी पोहोचताच आगीने रौद्ररूप धारण केले. सुदैवाने बसमधील प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
Mumbai BEST Double Decker Bus Fire : मुंबईत डबलडेकर बसला आग, सुदैवाने दुर्घटना टळली
बसमध्ये आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत कंडक्टरने तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती.
advertisement
या घटनेची माहिती आवश्यक कारवाईसाठी बस नियंत्रण कक्षाला तसेच संबंधित उपअभियंत्यांना देण्यात आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास प्रशासन करत असून, बॅटरीच्या तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 11:24 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai BEST Fire : मुंबईत भरपावसात बेस्टच्या 'डबलडेकर'ला आग! धावत्या बसमधील अग्नितांडवाने प्रवासी हादरले