Dadar Kabutarkhana : कबुतरखाना बंदीचा वाद पुन्हा चिघळणार! मुंबई महापालिकेने जारी केली महत्त्वाची सुचना
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Dadar KabutarKhana : दादरचा कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन धर्मीय आणि पक्षीप्रेमींनी आंदोलन करत कबुतरखान्यावरील शेड, ताडपात्री कापली. आता पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.
मुंबई: मुंबईत मागील काही दिवसांपासून कबुतरखाना बंदीवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाना बंद करण्याची कार्यवाही सुरू केली. मात्र, दादर कबुतरखाना बंद केल्यानंतर महापालिकेला विरोधाचा सामना करावा लागला. मुंबई महापालिकेने दादरचा कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन धर्मीय आणि पक्षीप्रेमींनी आंदोलन करत कबुतरखान्यावरील शेड, ताडपात्री कापली. आता पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.
कबुतरांमुळे मोठ्या प्रमाणावर श्वसनाशी संबंधित आजार होत असल्याने कबुतरखाना बंदीची मागणी करण्यात येत होती. कबुतरखानामध्ये कबुतरांना दाणे टाकण्यासही मनाई करण्यात आली होती. दाणे टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. त्यानंतर आता मुंबई महापालिका कंट्रोल फिडींगची सूचना जारी केली असून नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कबुतरखान्यावरील बंदीनंतर 'कंट्रोल फिडिंग'लाही नागरिकांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतरही आता पुन्हा मुंबई महापालिकेने कंट्रोल फिडिंगबाबत लोकांकडून सुचना, हरकती मागवल्या आहेत. यावरून पुन्हा एकदा वातावरण गरम होण्याची शक्यता आहे.
advertisement
मुंबईतील कबुतरखान्यांबाबत मुंबई महानगरपालिकेला दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि पल्लवी पाटील, अॅनिमल अँड बर्डस् राईटस् अॅक्टिविस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. हे तिन्ही अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?guest_user-english या लिंकवर पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती मुंबई महापालिकेने जारी केली आहे.
ऑनलाईन हरकती, सुचना कुठं नोंदवणार?
नागरिकांनी संकेतस्थळावर दिलेल्या या अर्ज वाचून आणि त्याचे अवलोकन करुन कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्या हरकती / सूचना suggestions@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 ते शुक्रवार, दिनांक 29 ऑगस्ट 2025 या कालावधीदरम्यान पाठवाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
लिखीत हरकती, सुचना इथं द्या...
सदर हरकती, सूचना लेखी स्वरुपात प्रत्यक्ष सादर करावयाच्या असतील तर त्या ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी, तिसरा मजला, एफ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-४०० ०१२’ येथे सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2025 1:34 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Dadar Kabutarkhana : कबुतरखाना बंदीचा वाद पुन्हा चिघळणार! मुंबई महापालिकेने जारी केली महत्त्वाची सुचना