Mumbai Railway Block : मुंबईकरांनो सावधान! पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा जम्बो ब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पश्चिम रेल्वेवरील बोरिवली आणि कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर पुढच्या महिन्याभरासाठी सहाव्या मार्गिकेच्याकामानिमित्त मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली आणि कांदिवली स्थानकादरम्यानची सर्व्हिस सुधारण्यासाठी सध्या सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर आता पुढच्या महिन्याभरासाठी सहाव्या मार्गिकेच्याकामानिमित्त मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे दररोज सुमारे 80 लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 20 डिसेंबर 2025 ते 18 जानेवारी 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतल्यामुळे पाचवी लाईन (Fifth Line) पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे ही सर्व्हिस रद्द करावी लागत आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ब्लॉक दरम्यान रेल्वे दररोज रात्री 11:30 ते 4:30 या वेळात काम हाती घेतले जाणार आहे. या वेळात रद्द केली जाणारी लोकल सेवा किती असेल याचा निर्णय रात्रीच ठरवला जाईल. याबद्दलची माहिती रेल्वेची अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात येईल."
advertisement
पाचवी लाईन बंद असल्यामुळे अनेक मेल- एक्सप्रेस ट्रेन आणि लोकल वेगवेगळ्या मार्गांनी वळवण्यात येणार आहेत. काही मेल- एक्सप्रेस ट्रेन आणि लोकल काही स्टेशनवर थांबू शकणार नाहीत किंवा वेगवेगळ्या मार्गावरून वळवल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान मेल- एक्सप्रेस ट्रेन आणि लोकल फास्ट मार्गांवरून चालवण्यात येणार आहे. हा ब्लॉक नवीन वर्षाच्या (31 डिसेंबर) काळात सुद्धा लागू राहणार आहे, मात्र रेल्वे प्रशासनाने त्या दिवशी प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीनुसार सभोवताली रद्द सेवा कमी करण्याचा प्रयत्न देखील केला जाणार असल्याचे सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 10:04 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Railway Block : मुंबईकरांनो सावधान! पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा जम्बो ब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहा









