Mumbai Local: रविवारचं काम आजच करा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, इथं चेक करा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला असून मुंबईकरांना योग्य ते नियोजन करावे लागेल.
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारची कामे आजच करून घ्यावी लागणार आहे. 29 जून रोजी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेचे वेळापत्रक पाहावे लागेल. मध्य रेल्वेने याबाबत घोषणा केली असून मुख्य आणि हार्बर मार्गावर 5 तासांचा ब्लॉक असणार आहे.
मुख्य मार्गावर मेगाब्लॉक
कुठे: ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्ग
कधी: सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान
परिणाम काय?:
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते 3.03 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद / अर्धजलद मार्गावरील लोकल ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.
advertisement
कल्याणमधून सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 या कालावधीत सुटणाऱ्या अप जलद /अर्धजलद लोकल कल्याण – ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. मुलुंड स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल / एक्स्प्रेस ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दादरला येणाऱ्या अप मेल / एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे / विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
advertisement
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
कुठे: पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 दरम्यान
परिणाम काय?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 4.12 दरम्यान बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 4.49 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
advertisement
ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 4.20 दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 4.53 दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी विभागात विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या कालावधीत ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल उपलब्ध असतील. तसेच ब्लॉक काळात पोर्ट मार्ग उपलब्ध असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 28, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: रविवारचं काम आजच करा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, इथं चेक करा वेळापत्रक


