Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपूनच वापरा, येत्या शनिवार, रविवारी सुट्टी, या भागात पुरवठा बंद राहणार

Last Updated:

Mumbai Water Cut: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. 2 दिवस काही भागाताली पाणी बंद राहणार आहे.

Mumbai Water Cut: शनिवार, रविवार पाण्याला सुट्टी, मुंबईतील या भागात पुरवठा बंद, कारण काय?
Mumbai Water Cut: शनिवार, रविवार पाण्याला सुट्टी, मुंबईतील या भागात पुरवठा बंद, कारण काय?
मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. धरणातील पाणीसाठा कमी झालेला असतानाच आता येत्या शनिवार आणि रविवारी काही भागात पुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत शनिवार, 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते रविवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत घाटकोपर पश्चिमेकडील जलवाहिनीसंबंधी विविध कामे करण्यात येणार आहेत. यामुळे ‘एन’ व 'एल' विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
कोणती कामे होणार?
जलवाहिनीसंबंधी कामांमध्ये संत तुकाराम पुलाजवळील 1500 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर 1200 मिलीमीटर व्यासाची झडप बसवण्यात येणार आहे. तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशयाच्या इनलेटवर 1400 मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे, 4 क्रॉस कनेक्शन तसेच दोन जलवाहिन्यांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे, असे पालिकेने सांगितले.
'एल' विभागात इथं पाणी नाही
‘एल’ विभागातील असल्फा गाव, एन. एस. एस. मार्ग, होमगार्ड वसाहत, नारायणनगर, साने गुरुजी उदंचन केंद्र, हिल नंबर 3, अशोक नगर, हिमालय सोसायटी, संजयनगर, समतानगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग, संघर्षनगर, खैराणी मार्ग, यादवनगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग, कुलकर्णी वाडी, मोहिली जलवाहिनी, भानुशालीवाडी, परेरावाडी या भागात पाणी बंद राहणार आहे.
advertisement
एन विभागातील या ठिकाणी पुरवठा बंद
भटवाडी, बर्वेनगर, पालिका वसाहत ए ते के, काजूटेकडी, राम जोशी मार्ग, रामजीनगर, आझादनगर, अकबर लाला कंपाउंड, पारशीवाडी, सोनिया गांधीनगर, बाळासाहेब देसाई वसाहत, आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राशी संलग्न विभाग, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, रामनगर शोषण टाकी व उदंचन केंद्राशी संलग्न विभाग, डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, विक्रोळी पार्कसाईटचा काही भागात पाणी बंद राहील.
advertisement
तसेच, सुभाषनगर, शिवाजीनगर, यशवंतनगर, औद्योगिक वसाहत रस्ता, गावदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरानगर - 1 आणि 2, अमिनाबाई चाळ आणि साईनाथ नगरचा काही भाग, गणेश नगर, सागर पार्क, जगदूशा नगर, मौलाना संकुल, कातोडीपाडा, भीमनगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, सेवानगर, ओएनजीसी वसाहत, माझगाव डॉक कॉलनी, अमृतनगर परिसर आदी ठिकाणी देखील पुरवठा बंद राहील.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपूनच वापरा, येत्या शनिवार, रविवारी सुट्टी, या भागात पुरवठा बंद राहणार
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement