Crime News : पंढरीशेठ फडकेंच्या दुश्मनाचे हाल, गोळीबार करून झाली मोठी चूक, नवीन अपडेट

Last Updated:

गेल्या आठवड्यात बैलगाडा शर्यतीवेळी वादानंतर गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

News18
News18
प्रमोद पाटील, पनवेल : कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे जखमी झाले होते. यातील राहुल पाटीलचा त्याआधी पंढरीशेठ फडके यांच्यासोबत राडा झाला होता. तेव्हाही गोळीबाराची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा गेल्या आठवड्यात बैलगाडा शर्यतीवेळी वादानंतर गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी राहुल पाटीलसह तिघांना अटक केली आहे. आता या नव्या राड्यामुळे राहुल पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी नवे अपडेट समोर आले आहेत.
राहुल पाटील याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यात 20 मार्चपर्यंत वाढ केली आहे. पनवेल तालुक्यात डुंगी नदीच्या काठावर शक्ती गायकवाड यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. यावेळी राहुल व जयेश पाटील यांच्या बैलांचा सामना झाला. राहुल पाटील यांचा बैल पराभूत झाला. तेव्हा जयेश पाटीलच्या समर्थकांनी गुलाल उधळला. याच जल्लोषावरून वाद झाला आहे राहुल पाटील याच्यासह समर्थकांनी दगडफेक केली. यावेळी एकाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना समजली होती.
advertisement
पनवेल तालुक्यात बैलगाडा शर्यतीवेळी झालेल्या राड्या प्रकरणी उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तर पिस्तूल मधून गोळीबार करणारा रडारवर आहे. लवकरच पिस्तूलसह त्याला पोलीस ताब्यात घेणार आहेत. तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे आणि पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले
पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना गोळीबाराच्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ मिळाले. त्यानंतर गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. राहुल पाटील हा कल्याणच्या आडिवली गावचा असून त्याच्याकडे शर्यतीत प्रसिद्ध असा मथूर नावाचा बैल आहे. शर्यत हमखास जिंकून देणारा अशी ओळख असणारा मथूर बैलगाडा शौकिनांचा लाडका आहे. याआधी बैलगाडा शर्यतीवेळी पढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्या संघर्षातून गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हाही राहुल पाटील चर्चेत आला होता.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Crime News : पंढरीशेठ फडकेंच्या दुश्मनाचे हाल, गोळीबार करून झाली मोठी चूक, नवीन अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement