Thane News : 22 व्या मजल्यावर आग लागली, मृत्यू झाला 28 व्या मजल्यावर, ठाण्यातील भयंकर घटना
- Published by:Prashant Gomane
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
ठाण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका इमारतीच्या 22 व्या मजल्यावर आगीची घटना घडली होती. ही आग इतकी भीषण होती की आसपासचे चार मजल्यामध्ये देखील धुरांचे लोण पसरले होते
अजित मांढरे, प्रतिनिधी
Thane News : ठाण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका इमारतीच्या 22 व्या मजल्यावर आगीची घटना घडली होती. ही आग इतकी भीषण होती की आसपासचे चार मजल्यामध्ये देखील धुरांचे लोण पसरले होते. याच धुरामुळे आता 28 व्या मजल्यावरील महिलेचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जयश्री ठाकरे (वय 36) असे या महिलेचे नाव आहे.या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कोलशेत एअरपोर्ट जवळील लोढा अमारा येथील कासा फ्रेस्को बिल्डिंगमधल्या 22 व्या मजल्यावर एका घरात आगीची घटना घडली होती. ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूचे मजल्यावर देखील धुरांचे लोण पसरले होते. त्यामुळे काळाकुट्ट अंधार दाटला होता.
दरम्यान या आगीने 22 व्या मजल्यावरील सुदैवाने कोणतीही जिवितनाही झाली नाही. पण या आगीमुळे 28व्या मजल्यावर राहणाऱ्या जयश्री ठाकरे (वय 36) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने आश्चर्य व्यक्त होत आहे.कारण आग 22 व्या मजल्यावर लागली आणि मृत्यू 28 व्या मजल्यावर झाला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार 22 व्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे 22 ते 28 मजले धुरांमुळे कोंडले गेले होते. यामुळे 28 व्या मजल्यावरील रुम नंबर 2805 या फ्लॅट मधील रहिवाशी जयश्री ठाकरे यांचा धुरामुळे श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने ठाण्यात हळहळ व्यक्त होतेय.
या आगीमुळे 22 ते 28 मजल्या पर्यंतचे सर्व फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या ही आग विझवण्यात यश आले आहे.पण ही आग नेमकी घरात कशी लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही आहे. याचा तपास सूरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 10:56 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thane News : 22 व्या मजल्यावर आग लागली, मृत्यू झाला 28 व्या मजल्यावर, ठाण्यातील भयंकर घटना


