प्रवांशासाठी आनंदाची बातमी; दिल्लीनंतर उबरची 'ही' सेवा आता पुणे-मुंबईत;जाणून घ्या सविस्तर

Last Updated:

Mumbai Pune Uber Premium Caravan Service : पुणे आणि मुंबईदरम्यान उबेरची नवीन आलिशान आणि आरामदायक कारवाँ सेवा लवकरच सुरू होत आहे. ही सेवा तुम्हाला प्रवासाचा एक शानदार अनुभव देईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत खासगी आणि अत्यंत सुखकर प्रवास करू शकाल.

News18
News18
मुंबई : प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आरामदायी प्रवासासाठी मोटारहोम आता पुणे-मुंबईतही उपलब्ध झाले आहेत. उबरने दिल्लीत सुरू केलेल्या आलिशान आणि अत्याधुनिक कॅराव्हान सेवेनंतर या यशस्वी प्रयोगाचा विस्तार आता पुणे, मुंबई आणि बंगळुरूत केला आहे. या सेवेमुळे शहरातून दूरच्या प्रवासाला जाणारे प्रवासी आता अधिक आरामदायी आणि सुविधाजनक प्रवासाचा अनुभव घेऊ शकतील.
मुंबई, बंगळुरू आणि पुण्यातील इंटरसिटी मोटारहोम्स 15 ऑक्टोबरपासून बुक करता येतील तर बुकिंगची सुरूवात 13 ऑक्टोबरपासून होईल. दिल्लीमध्ये ही सेवा आधीपासून यशस्वी आहे आणि प्रवाशांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यंदा पावसाळी पर्यटन हंगामादरम्यान दिल्लीत एका महिन्याच्या उपक्रमात मोटारहोमला शंभर टक्के मागणी मिळाली होती. या यशामुळे इतर शहरांमधील प्रवाशांकडूनही मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू झाली आहे, ज्यातून देशातील या सेवेची वाढती मागणी दिसून येते.
advertisement
उबर इंडियाचे संचालक शिव शैलेंद्रन म्हणाले की, दोन शहरांमधील प्रवासासाठी उबर इंटरसिटी हा विश्वासार्ह आणि आरामदायी पर्याय बनला आहे. कौटुंबिक गाठीभेटी किंवा व्यवसाय भेटीसाठी दुसऱ्या शहरात जाताना इंटरसिटीला प्राधान्य देत आहेत. आता या सेवेत मोटारहोमचा समावेश केल्यामुळे लांब अंतराचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर हा पर्यटनाचा मुख्य काळ मानला जातो. सण, लग्नसमारंभ आणि  हिवाळ्यामुळे नागरिक या काळात प्रवासाला प्राधान्य देतात.  सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक प्रवासासाठी बाहेर पडतात.
advertisement
प्रत्येक इंटरसिटी मोटारहोममध्ये प्रवाशांसाठी टेलिव्हिजन, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिनी-रेफ्रिजरेटर आणि स्वच्छतागृह यासह सुविधा उपलब्ध आहेत. 4 ते 5 प्रवाशांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था असून प्रवासादरम्यान मदत करण्यासाठी एक चालत आणि एक सहाय्यक कर्मचारी सोबत असतो. प्रवाशांना थांबे वाढविण्याची सुविधा, रिअल टाइम राईड ट्रॅकिंग आणि 24 तास लाइव्ह सपोर्ट देखील उपलब्ध आहे. मोटारहोम नियोजित प्रवासासाठी किमान 48 तास आधी बुक करणे आवश्यक आहे.
advertisement
यामुळे उबरच्या मोटारहोम सेवेचा विस्तार पुणे, मुंबई आणि बंगळुरूमध्ये प्रवाशांसाठी एक अनोखा, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय ठरणार आहे, ज्यामुळे लांब अंतराचा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि आनंददायी होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवांशासाठी आनंदाची बातमी; दिल्लीनंतर उबरची 'ही' सेवा आता पुणे-मुंबईत;जाणून घ्या सविस्तर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement