Vasai Uttan Dongri Ro Ro Service : मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय, ठाणे- नवी मुंबईत जाण्यासाठी होणार फायदा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Vasai Uttan Dongri Ro Ro Service : मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. वसईच्या खाडीवरील नागला पोर्ट आणि पश्चिम किनाऱ्यावरील उत्तन डोंगरी मार्गावर येत्या काळात रो- रो सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. वसईच्या खाडीवरील नागला पोर्ट आणि पश्चिम किनाऱ्यावरील उत्तन डोंगरी मार्गावर येत्या काळात रो- रो सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भविष्यामध्ये रो- रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. याअंतर्गंत दोन्ही ठिकाणी जेट्टी बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाला कोस्टल रेगुलेशन झोन (CRZ) कडून मंजुरी मिळाली आहे.
राज्य सरकारने राज्यातला किनारी भाग प्रवाशांशी जोडण्याचे धोरण आखले आहे. या धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र सागरी मंडळ करत आहे. त्या अंतर्गत किनारपट्ट्यांवर जेट्टी उभारण्यात येणार आहेत. त्यातच उत्तन डोंगरी आणि नागला बंदर येथे रो- रो सेवेच्या दृष्टीने जेट्टी बनवण्यासाठी सीआरझेडकडून महत्त्वपूर्ण मंजुरी मिळवली आहे. या अंतर्गत नागला बंदर आणि उत्तन या दोन्हीही ठिकाणी 143 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदीच्या जेट्टी उभारल्या जाणार आहेत. या जेट्टी सर्वाधिक लांबीच्या असून रो- रो सारखे मोठे जहाज तेथे उभे करणार आहेत.
advertisement
जल वाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मंडळाकडून आणखी एक नागला बंदर आणि उत्तन या ठिकाणी मोठे केंद्र उभारले जाणार आहेत. यासाठी जेट्टीव्यतिरिक्त पार्किंग स्थळ, बोटीत चढण्यासाठीचा मार्ग आणि एक सुरक्षा भिंतदेखील उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये नागला बंदर येथे 2,025 चौरस मीटर, तर उत्तन डोंगरी येथे 7,200 चौरस मीटर क्षेत्रफळाचा वाहनतळ, नागला बंदर येथे 45.42 मीटर उंचीची, तर उत्तन डोंगरी येथे 60 मीटर उंचीची संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. या सर्व बांधकामाला महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाने सीआरझेडसोबत कांदळवनांसंबंधीच्या उपाययोजना करण्यासह मंजुरी दिली आहे. तसेच अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या संबंधित प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
advertisement
ठाणे, नवी मुंबईकरांसाठी योजना, नवी मुंबई-ठाणेकरांना कसा होईल फायदा?
महाराष्ट्र सागरी मंडळाने ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रात चार जेट्टी बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाशी, ऐरोली, मुलुंड मीठानगर क्षेत्र आणि ठाण्यातील चेंदणी कोळी वाड्याजवळ मीठबंदर आहे. मात्र इथे वन विभागाची अद्याप परवानगी नसल्यामुळे प्रस्ताव आत्तापर्यंत एमसीझेडएमएने अद्याप मंजूर केलेला नाही. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर ठाणे, नवी मुंबई, वसईपर्यंत मुंबईच्या उत्तर- पश्चिम किनार पट्टीही जोडली जाणार आहेत. प्रस्ताव मंत्रालयाच्या संबंधित अधिकार्यांना पाठवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 9:14 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Uttan Dongri Ro Ro Service : मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय, ठाणे- नवी मुंबईत जाण्यासाठी होणार फायदा