Vidhan Parishad Election 2024: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट! या ठिकाणी बंडखोरी कायम

Last Updated:

Vidhan Parishad Election 2024: राज्यातील रिक्त झालेल्या 4 विधान परिषद जागांचे चित्र अखेर स्पष्ट झालं आहे.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट!
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट!
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं घमासान संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) आणि महायुती (Mahayuti) दोघांना बंडखोरांचे आव्हान असणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी दोघांनाही बंड थंड करण्यात यश आलं आहे. मुंबई शिक्षक (Mumbai News), मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये येत्या 26 जूनला निवडणुका होणार आहेत. सर्व निवडणुकींचं चित्र आता स्पष्ट झालं आहे.
विधान परीषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील लढती
1) मुंबई शिक्षक मतदारसंघ
ज.मो. अभ्यंकर (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध सुभाष मोरे (शिक्षक भारती) विरुद्ध शिवाजीराव नलावडे (NCP AP)
2) मुंबई पदवीधर मतदारसंघ
अनिल परब (ठाकरे गट) विरुद्ध किरण शेलार (भाजप)
3) नाशिक शिक्षक मतदारसंघ
संदीप गुळवे (ठाकरे गट) विरुद्ध किशोर दराडे (शिवसेना) विरुद्ध महेंद्र भावसार (Ncp AP) विरुद्ध विवेक कोल्हे (अपक्ष मूळ भाजपचा)
advertisement
4) कोकण पदवीधर मतदारसंघ
रमेश कीर (काँग्रेस) विरुद्ध निरंजन डावखरे (भाजप)
नाशिकमधून धनराज विसपुते यांची माघार
नाशिक शिक्षक मतदार संघाची जागा महायुतीत शिंदे गटाला सुटली आहे. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या सूचनेचे पालन करत आहे. उमेदवारी अर्ज भरताना जागा कुणाला सुटेल यासंदर्भात चर्चा सुरू होती. गेल्यावेळी भाजपने ही जागा लढवली होती. त्यामुळे भाजपला जागा सुटलेल्या दृष्टिकोनातून हा अर्ज भरला होता. गेल्यावेळी पदवीधरला पुढच्या वेळी विचार करू असे सांगितले. आता पुढच्या वेळी निश्चित संधी देखील अशी खात्री आहे, अशी प्रतिक्रिया धनराज विसपुते यांनी दिली.
advertisement
अखेरच्या क्षणी राजेंद्र विखे पाटील यांची माघार
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. प्रतिनिधी पाठवून नाशिक शिक्षक मतदार संघातून आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला. तीन वाजेपर्यंत राजेंद्र विखे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर राजेंद्र विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राजेंद्र विखे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे
कोकण पदवीधर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मोरे यांनी आपला फॉर्म मागे घेतला असून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी पाठिंबा असल्याचे जाहीर केलं. महायुतीकडून कोकण पदवीधर मतदार संघातून भाजप कडून निरंजन डावखरे आणि शिंदे शिवसेनेकडून संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. आज मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत आपण महायुतीचे नेत्यांशी बोलून आणि त्यांचे आदेश मानत आमचा उमेदवार म्हणून निरंजन डावखरे यांचे काम करून त्यांना निवडून आणणार असल्याचा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vidhan Parishad Election 2024: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट! या ठिकाणी बंडखोरी कायम
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement