सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे महिला वाद्य महोत्सव, भायखळा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात तीन दिवसांचा महोत्सव
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने महिला वाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने महिला वाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात तालवाद्यांची मैफल, जुगलबंदी, भक्तिसंगीतातील वाद्य वादन, तसेच पारंपरिक व पाश्चात्य लोकसंगीताची मैफल सादर होईल.
महिला वाद्य महोत्सव २० ते २२ मार्च २०२५ दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, भायखळा येथे होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पनी अॅड. आशिष शेलार, मा मंत्री सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान यांची आहे. महिला वाद्य महोत्सव सर्वांसाठी निःशुल्क असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विकास खरगे, मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग आणि श्री विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
advertisement
महिला वाद्य महोत्सव कार्यक्रम
गुरुवारी २० मार्च रोजी ‘तालसखी- तालवाद्यांची मैफल' होईल. याअंतर्गत पंडित रवी चारी- सितार सिम्फनीमध्ये महिलांच्या सतारवादनाचा आनंद घेता येईल. यामध्ये कविता लोटलीकर- खुशी चौगुले आणि २५ महिला सतार वादक साथसंगत, डॉ. मनीषा कुलकर्णी ( हार्मोनियम ), मोहिनी चारी (हार्मोनियम), नेहा मुळये ( पर्कशन), गायत्री पाध्ये ( तबला), उन्मेषा गांगल ( तबला ), भाग्यश्री चारी (ड्रम्स), सलोनी अग्रवाल (कीबोर्ड) सहभागी होतील. त्यानंतर सावनी तळवलकर (तबला), कौशिकी जोगळेकर (लेहरा साथ) या ‘तालसखी' सादर करतील. तालवाद्य जुगलबंदीमध्ये मुक्ता रास्ते ( तबला), प्रेषिता मोरे (ढोलकी ढोलक) , हमता बाघी ( डफ), सुप्रिया मोडक (हार्मोनियम), उमा देवराज ( कीबोर्ड), किरण बिश्त ( बासरी) यांच्या जुगलबंदीचा आनंद घेता येईल. ताल मॅट्रीक्स ग्रुपची ही प्रस्तुती आहे. सुसंवादिका चैताली कानिटकर यांचे आहे.
advertisement
शुक्रवार २१ मार्च रोजी ‘ स्वरायणी - भक्तिसंगीतातील साज' हा कार्यक्रम होईल. याअंतर्गत भक्तिसंगीतातील पारंपरिक वाद्य वादन सादर होईल. सादरकर्ते आहेत कौशिकी जोगळेकर (संवादिनी ), स्वप्नगंगा करमरकर ( तबला ), श्रुतिका मोरे ( तबला) , देवयानी मोहोळ ( पखावज), शलाका मोरे ( व्हायोलिन), वरदा खाडिलकर ( संतूर), वेदश्री रावडे ( तालवाद्ये).
advertisement
‘अभंग नवा' हा कार्यक्रम अनुभवता येईल. सादरकर्त्या- श्रुती भावे (व्हायोलिन), दर्शना जोग (कीटार), कल्याणी देशपांडे ( सतार ), राधिका अंतुरकर (इलेक्ट्रिक गिटार ), स्वप्नगंगा करमरकर ( कोहन बॉक्स), श्रुतिका मोरे ( पखवाज) , नयनतारा (हार्प), कौशिकी जोगळेकर ( कीबोर्ड), वेदश्री रावडे ( तालवाद्ये), सुखदा भावे -दाबके ( हार्मोनियम ), सुचिस्मिता चॅटर्जी (बासरी ), प्रिया वझे ( ऑक्टोपॅड), वरदा खाडिलकर ( संतूर), तर सुसंवादिका अनघा मोडक आहेत.
advertisement
शनिवार २२ मार्च रोजी ‘लोकस्वरा' ही महाराष्ट्र, गोवा आणि पाश्चात्य लोकसंगीत मैफल सादर होईल. याअंतर्गत विविध भाषांमधील लोकसंगीताचा मागोवा घेणारा मर्लिन डिसुझा आणि ग्रुपचा ‘इंडिवा' कार्यक्रम सादर होईल त्यानंतर पारंपरिक लोकवाद्यांचे अंतरंग उलगडणारा ‘लोकपरंपरा' कार्यक्रम होईल. यामध्ये मोहिनी भुसे ( संबळ), देवयानी मोहोळ ( ढोलकी, दिमडी), श्रुतिका मोरे (धनगरी ढोल, पखवाज ) , कस्तुरी कुलकर्णी ( बासरी) सहभागी होतील. त्यानंतर पवन तटकरे आणि ग्रुपचे लोकनृत्य तर वंदना पांचाळ आणि ग्रुपचे लावणीनृत्य पाहता येईल. या कार्यक्रमाच्या सुसंवादिका वृंदा दाभोळकर आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 17, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे महिला वाद्य महोत्सव, भायखळा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात तीन दिवसांचा महोत्सव