एक-दोनवर थांबलात? नुकसान तुमचंच! 'या' सरकारकडून मोठ्या कुटुंबांना मिळणार बोनस!

Last Updated:

Andhra CM N Chandrababu Naidu : एका बाजूला वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे लोकसंख्या वाढीसाठी आता खुद्द सरकारने पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.

News18
News18
नवी दिल्ली: एका बाजूला वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे लोकसंख्या वाढीसाठी आता खुद्द सरकारने पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोठ्या कुटुंबाना आर्थिक मदत देणार असल्याचा विचार करत असल्याचे म्हटले. महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांनी लोकजागृती, शासकीय पातळीवर प्रयत्न करून मागील काही दशकात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवले होते. आता मात्र आंध्र प्रदेश सरकारने लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्याचे संकेत दिले आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तसे संकेत दिले. राज्य सरकार मोठ्या कुटुंबांना आर्थिक मदत देऊ शकते.आंध्रमध्ये, 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना पंचायत आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका लढवण्यापासून रोखण्यासाठी कायद्यात आधीच सुधारणा करण्यात आली आहे.

मोठ्या कुटुंबांना सरकार आर्थिक मदत देईल: मुख्यमंत्री नायडू

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले, कुटुंबाला एक युनिट मानून आमचं सरकार आर्थिक मदत देण्याचा विचार करत आहे. मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहन देता येईल. त्याच वेळी, त्यांनी शून्य गरिबी उपक्रमाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की आंध्र प्रदेशातील प्रजनन दर वाढवावा लागेल. सध्याच्या प्रजनन दरामुळे राज्यात भविष्यात अनेक समस्या उद्भवतील.
advertisement
अलीकडेच चंद्राबाबू यांनी महिलांच्या प्रसूती रजेबाबत घोषणा केली होती. महिला कर्मचारी त्यांना पाहिजे तितक्या वेळा प्रसूती रजा घेऊ शकतात, असे नायडू यांनी म्हटले होते.
काही दिवसांपूर्वी तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले होते की, जुन्या काळात दाम्पत्याला चार-पाच मुलं असायची. सध्यची पिढी फक्त एकाच मुलावर थांबली आहे. तर, काहीजण म्हणतात की आम्हाला मुलं नसल्याने नवरा-बायकोच्या उत्पन्नातून आणखी मौज करू, आता त्यांच्या आई-वडिलांनी असाच विचार केला असता तर ते या जगात आले असते का, असा सवालही चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.
advertisement
दक्षिण कोरिया, जपान आणि इतर काही देशांचे उदाहरण देत त्यांनी म्हटले की, तेथील लोकांना घटत्या लोकसंख्येच्या दुष्परिणामाची माहिती नाही. तेथील लोक फक्त पैसे कमावण्याच्या मागे असून देशाच्या प्रगतीवरच अधिक लक्ष केंद्रीत करतात, असेही त्यांनी म्हटले.
मराठी बातम्या/देश/
एक-दोनवर थांबलात? नुकसान तुमचंच! 'या' सरकारकडून मोठ्या कुटुंबांना मिळणार बोनस!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement