अयोध्येत घडले महापाप! क्रुरतेची परिसीमा ओलांडली; २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या, बरगड्या तुटलेल्या, शरीरावर...

Last Updated:

Ayodhya Rape Case: अयोध्येत 22 वर्षीय तरूणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्या होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयीत आरोपींना अटक केली आहे.

News18
News18
अयोध्या: उतर प्रदेशमधील एक भयानक घडनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अयोध्यातील एका गावात २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले. हा अत्याचार इतका भयंकर होता की, त्यात तरुणीचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे तरुणीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या बाबतीत मौन बाळगले आहे.तरुणीवर बलात्कार झाला की नाही? याबाबत शवविच्छेदनानंतर २४ तास उलटल्यानंतरही पोलीस काहीच सांगत नाहीत.सूत्रांच्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवालात तरुणीचा मृत्यू अत्यधिक रक्तस्त्रावामुळे झाल्याचे नमूद केल्याचे समजते. तिच्या बरगड्याही तुटलेल्या होत्या आणि शरीरावर ३० हून अधिक जखमा होत्या. शरीरावरील जखमांवरून तिच्यासोबत झालेल्या अमानुषतेचे स्पष्ट होते.
अयोध्या जवळच्या एका गावातील गतिमंद तरुणी गुरुवारी रात्री गावातील भंडाऱ्यात गेली होती. शनिवारी दुपारी तिचे निर्वस्त्र शव गावाबाहेर एका कोरड्या नाल्यात सापडले. तिचे हात-पाय झाडाच्या वेलींनी बांधले होते. तिच्या खासगी अवयवांवरही खोल जखमा होत्या. तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी शनिवारी दुपारच्या सुमारास डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन केले.मात्र रविवारी दुपारपर्यंत शवविच्छेदन अहवाल देण्यास पोलीस अधिकारी टाळाटाळ करत होते. इतक्या गंभीर प्रकरणातही शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे उपलब्ध नसने हे धक्कादायक आहे.
advertisement
शिवराजने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या; चंद्रहार पाटलांचे धक्कादायक वक्तव्य
सूत्रांनुसार दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवालात तरुणीवर भंयकर अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. तिच्या दोन्ही बाजूंच्या बरगड्या तुटलेल्या होत्या. खासगी अवयवांमधून अतिप्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. शरीरावर विविध भागांवर ३० हून अधिक जखमा आणि ओरखड्यांचे व्रण आढळले. रक्तस्त्राव व अवयवांची स्थिती पाहून तज्ज्ञांनी या घटनेत दोन किंवा अधिक आरोपी सहभागी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
सीओ अयोध्या आशुतोष तिवारी यांनी सांगितले की, त्यांना अद्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही. चार-पाच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून बलात्काराचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी शवविच्छेदन अहवाल आल्यावरच सत्य स्पष्ट होईल.
advertisement
सीएम योगींनी घेतली दखल
तरुणीच्या हत्येच्या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी श्रम आणि रोजगार राज्यमंत्री यांना पीडित कुटुंबाशी भेट घेण्यासाठी तरुणीच्या घरी पाठवले आणि शक्य तितकी मदत करत न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरही संवाद साधला आहे.
पॉर्न स्टारला 25व्या वर्षी आला Heart Attack; उपचार घेत असताना घडले भयंकर
श्रम व सेवायोजन राज्यमंत्री मनोहर लाल कोरी मन्नू रविवारी अयोध्या येथे पोहोचले. त्यांनी तरुणीच्या कुटुंबाशी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली असून दोषींना सोडले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/देश/
अयोध्येत घडले महापाप! क्रुरतेची परिसीमा ओलांडली; २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या, बरगड्या तुटलेल्या, शरीरावर...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement