Bihar Result: बिहार निकालाआधी 12 तासआधी खळबळ, या मतांची मोजणी होणार नाही; निर्णायक क्षणीच कोर्ट देईल आदेश
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Bihar Election Result: बिहार निवडणुकीच्या निकालाआधी अवघ्या काही तासांवर आला आहे. उद्या म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. टेंडर वोटचा मुद्दा चर्चेत आला आहे. मतदान केंद्रावर तुमच्या नावाने आधीच मतदान झाले असेल, तर तुम्हाला दिले जाणारे हे खास मत सामान्य काउंटिंगमध्ये मोजलेच जात नाही. फक्त न्यायालयाच्या आदेशानेच ते उघडले जाते.
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याचा निकाल काही तासांमध्ये समोर येणार आहे आणि सर्वांची नजर काउंटिंगवर आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, काही असे मतदारही असतात ज्यांचे मत टाकले गेले असले तरी त्यांच्या मतांची मोजणी शुक्रवारी होणाऱ्या काउंटिंगमध्ये केली जाणार नाही.
advertisement
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार काही विशिष्ट प्रकारच्या मतांची नियमित काउंटिंगमध्ये गणना केली जात नाही. हे मत टेंडर वोट म्हणून ओळखले जातात. हे खास परिस्थितीत दिले जाणारे विशेष मत असतात, ज्यांना सामान्य मतांसोबत मोजले जात नाही. बहुतेक वेळा या मतांची मोजणी केली जात नाही आणि ते सीलबंद स्वरूपात सुरक्षित ठेवले जातात. केवळ न्यायालयाच्या आदेशानंतरच विशेष परिस्थितीत ही मतपत्रे उघडून मोजली जातात.
advertisement
टेंडर वोट म्हणजे नेमके काय?
अनेकदा असे घडते की मतदार जेव्हा मतदान केंद्रावर जातात तेव्हा त्यांना लक्षात येते की त्यांच्या नावाने आधीच कोणी तरी मतदान केलेले आहे. अशा परिस्थितीत मतदाराला मतदानाचा हक्क नाकारला जात नाही. त्याला एक विशेष प्रकारचे बॅलेट पेपर देऊन मतदान करण्याची परवानगी दिली जाते. हे मत म्हणजेच टेंडर वोट. या मतपत्रिकांना स्वतंत्रपणे सीलबंद करून ठेवले जाते. नियमित मतमोजणीत यांची गणना केली जात नाही. मात्र एखाद्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये बरोबरी किंवा खूपच कमी फरक आढळल्यास आणि प्रकरण न्यायालयात गेले तर न्यायालयाच्या आदेशानुसार या मतांची मोजणी केली जाऊ शकते.
advertisement
निवडणूक संचालन नियम, 1961 च्या कलम 49Pनुसार जर मतदाराला असे जाणवले की त्याच्या नावाने आधीच मतदान झाले आहे, तर तो तात्काळ प्रिसाइडिंग ऑफिसरला या बाबत माहिती देऊ शकतो. त्याची ओळख पडताळल्यानंतर त्याला टेंडर वोट देण्याची परवानगी दिली जाते. हे मत सीलबंद पेटीत ठेवले जाते आणि सामान्य काउंटिंगमध्ये यात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. न्यायालयाचा आदेश आल्यासच ही पेटी उघडली जाऊ शकते.
advertisement
अशा मतांची मोजणी नेमकी केव्हा होते?
हे फक्त खास परिस्थितीतच घडते. द हिंदूच्या एका अहवालानुसार राजस्थान विधानसभा निवडणूक 2008 मध्ये काँग्रेसचे सी.पी. जोशी आणि भाजपचे कल्याण सिंह चौहान यांच्या मतांमध्ये फक्त एक मताचा फरक होता. त्यामुळे न्यायालयाने टेंडर वोट उघडून मोजण्याचा आदेश दिला. न्यायालयाचा हस्तक्षेप नसता, तर ही मते मोजलीही गेली नसती. निवडणूक संचालन नियमांच्या कलम 56नुसार टेंडर वोट सामान्य मतमोजणीत जोडले जात नाहीत आणि कायम सीलबंदच ठेवले जातात.
advertisement
काही वेळा अशी ही चर्चा होते की, जर 14% पेक्षा जास्त टेंडर वोट पडले तर पुन्हा मतदान (री-पोल) करावे लागते. मात्र निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की 14% किंवा त्याहून अधिक टेंडर वोट पडले तरी पुनर्मतदानाची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे अशा प्रकारचे दावे चुकीचे आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 9:01 PM IST
मराठी बातम्या/देश/
Bihar Result: बिहार निकालाआधी 12 तासआधी खळबळ, या मतांची मोजणी होणार नाही; निर्णायक क्षणीच कोर्ट देईल आदेश


