Bihar Exit Poll: बिहारमध्ये वारं फिरलं, NDA आणि महागठबंधनाला किती जागा? नवे आकडे समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया संपली आहे. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज येणे सुरू झाले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. संध्याकाळी इच्छुक उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. बिहारमध्ये 243 जागांपैकी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील 122 जागांवर मतदान पूर्ण होताच एक्झिट पोलचे (Exit Poll) निकाल समोर आले आहे. चाणक्य एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहे. यामध्ये एनडीए सरकार अगदी काठावर पास झालं आहे. भाजप आणि नितीश कुमार यांच्या एनडीए आघाडीला 130 ते 138 जागांचा अंदाज वर्तवला आहे. तर महागठबंधन इंडिया आघाडीला 100-108 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया संपली आहे. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज येणे सुरू झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रतिष्ठेचा समजला जाणारा चाणक्य STRATEGIES चा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या पोलमध्ये बिहारमध्ये NDA सरकार बनणार असा अंदाज वर्तवला आहे. बिहार निवडणुकीत एनडीए आघाडीला 130-138 जागा मिळतील असं सांगितलं आहे, तर इंडिया आघाडी अर्थात महागठबंधनला 100 ते 108 जागा मिळतील. त्यामुळे महागठबंधनला पुन्हा एकदा विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. तर इतरांना 3 ते 5 जागा मिळणार आहे. एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहे. 243 जागांसाठी १२२ जागांसाठी बहुमताचा आकडा गाठवा लागणार आहे.
advertisement
NDA आणि इंडिया आघाडीमध्ये काँटे की टक्कर
बिहारमध्ये या वेळी पहिल्या टप्प्यात विक्रमी 64.66 टक्के मतदान झालं. मंगळवारी झालेल्या मतदानात 67.14 टक्के मतदानाची नोंद झाली, जे राज्याच्या इतिहासात सर्वात जास्त मतदान आहे. त्यामुळेच हे विक्रमी मतदान हे चांगल्या किंवा आश्चर्यकारक निकालाचे संकेत देत आहे.
बिहार निवडणुकीत यावेळी एनडीए (NDA) आणि महागठबंधन यांच्यात कांटे की टक्कर आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 3.7 कोटी पेक्षा जास्त मतदारांनी 1302 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केलं आहे. या टप्प्यात एनडीएने 122 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते . ज्यात भाजप (BJP) चे 53 आणि जेडीयू (JDU) चे 44 उमेदवारांचा समावेश आहे.. दुसरीकडे, इंडिया आघाडीकडून आरजेडी (RJD) चे 71 आणि काँग्रेस (Congress) चे 37 उमेदवारांसह एकूण 127 उमेदवार रिंगणात आहेत. आता बिहार निवडणुकीची मतमोजणी ही 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे, तेव्हाच चित्र स्पष्ट होईल.
view commentsLocation :
Bihar
First Published :
November 11, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/देश/
Bihar Exit Poll: बिहारमध्ये वारं फिरलं, NDA आणि महागठबंधनाला किती जागा? नवे आकडे समोर


