आधी मिसाईल विकले, आता ऐन युद्धाच्या क्षणी कोलांटउडी, चीनचा पाकड्यांना धक्का, भारतासाठी गूड न्यूज
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
India-Pakistan Conflict: भारत- पाकिस्तानमधील संघर्षाची धग वाढत असताना आता चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची आग आता आणखी भडकली आहे. पाकिस्तान सतत नापाक कारवाया करत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा अंधारात पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले. यानंतर भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले हाणून पाडले. दरम्यान, पाकिस्तानने आता थेट भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. पण भारतीय सैन्यांनी हा पाकिस्तानचा इरादा हाणून पाडला.
एकीकडे भारत- पाकिस्तानमधील संघर्षाची धग वाढत असताना आता चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यावेळी दोन्ही देशात संघर्षाची ठिणगी पडली, तेव्हा चीन पाकिस्तानची बाजू घेईल असं म्हटलं जात होतं. मात्र चीनने ऐनवेळी कोलांटउडी मारत तटस्थ भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. ही भारतासाठी गूड न्यूज समजली जात आहे. कारण चीन पाकिस्तानच्या मदतीला उतरला असता तर भारतासमोरील आव्हान आणखी वाढलं असतं. पण तसं झालं नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन काढत दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलं आहे.
advertisement
भारत आणि पाकिस्तानला तणाव वाढू नये, यावर चीनने भर दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही भारत आणि पाकिस्तान दोघांनाही शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य देण्याचे, शांत आणि संयमी राहण्याचे, शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आणि दोन्ही देशात तणाव वाढेल, अशी कृती टाळण्याचे आवाहन करतो."
Pakistan continued its hostilities on 10 May 2025 by targeting places of worship like the famous Shambhu Temple and residential areas in Jammu. Multiple armed drones have been sent through the night, endangering civilians and religious sites. The Indian Armed Forces remain… pic.twitter.com/o317h7XChC
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 10, 2025
advertisement
दुसरीकडे, पाकिस्तानने शुक्रवारी १० मे २०२५ रोजी जम्मूमधील प्रसिद्ध प्रार्थनास्थळ शंभू मंदिर आणि नागरी परिसराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकने रात्री अनेक सशस्त्र ड्रोन पाठवले. ज्यामुळे नागरिक आणि धार्मिक स्थळांना धोका निर्माण झाला. भारतीय सशस्त्र दलाच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानचा हा इरादा हाणून पाडण्यात आला.
Location :
Delhi
First Published :
May 10, 2025 12:28 PM IST
मराठी बातम्या/देश/
आधी मिसाईल विकले, आता ऐन युद्धाच्या क्षणी कोलांटउडी, चीनचा पाकड्यांना धक्का, भारतासाठी गूड न्यूज