जीव वाचवण्यासाठी 10 वर्षांच्या बहीण भावाची सातव्या मजल्यावरुन उडी, वडिलांच्या दुर्देवी मृत्यूचा VIDEO

Last Updated:

आगीनं उद्ध्वस्त केलं, जीव वाचवण्यासाठी 10 वर्षांच्या भावा-बहिणीनं मारली उडी, वडिलांचाही मृत्यू, LIVE VIDEO

News18
News18
मुंबई: घरात आग लागली आणि मोठा अनर्थ घडला. ही आग काही मिनिटांत पसली, जीव वाचवण्यासाठी चक्क 10 वर्षांच्या बहीण भावाने बाल्कनितून खाली उडी मारली. आगीच्या झळा तीव्र होत होत्या. त्यांच्या पाठोपाठ वडिलांनी देखील उडी मारली. आगीतून वाचले मात्र सातव्या मजल्यावरुन पडून जास्त रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील द्वारका येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्याने एक मोठी दुर्घटना घडली. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या इमारतीतून जीव वाचवण्यासाठी सातव्या मजल्यावर असलेल्या एका कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह वडिलांनी सातव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या हृदयद्रावक घटनेत बहीण भाऊ आणि त्यांच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली.
advertisement
दिल्लीच्या द्वारका सेक्टर-13 येथील एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. आगीची भीषणता इतकी होती की, काही क्षणातच संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच धावपळ उडाली. आगीच्या लपेट्यात स्वतःला पूर्णपणे वेढलेले पाहून, सातव्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाची सदस्य घाबरले. आपला जीव वाचवण्यासाठी एका मुलाने, एका मुलीने आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांनी इमारतीवरून खाली उडी मारली.
advertisement
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका सेक्टर 13 मधील शपथ सोसायटीमध्ये आठव्या आणि नवव्या मजल्यावर आग लागली होती. 10 वर्षांचे बहीण भावाने स्वतःला वाचवण्यासाठी बाल्कनीतून उडी मारली. त्यांना तातडीने जवळच्या आकाश रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर काही वेळाने या मुलांचे वडील यश यादव (वय ३५) यांनीही बाल्कनीतून उडी मारली. त्यांना आयजीआय रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. यश यादव यांचा फ्लेक्स बोर्ड व्यवसाया होता.
advertisement
यश यादव यांची पत्नी आणि त्यांचा मोठा मुलगा या आगीतून सुदैवाने बचावले असून ते सुरक्षित आहेत. त्यांना वैद्यकीय मदतीसाठी आयजीआय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सोसायटीमधील सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीची वीज आणि पीएनजी (PNG) कनेक्शन यांसारख्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
मराठी बातम्या/देश/
जीव वाचवण्यासाठी 10 वर्षांच्या बहीण भावाची सातव्या मजल्यावरुन उडी, वडिलांच्या दुर्देवी मृत्यूचा VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement