6 डिसेंबर 4 शहरं, 8 साखळी स्फोटांचा कट, तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात डॉ. उमर नबी, मुजम्मिल, आदिल अहमद राथर यांचा कट उधळला गेला. अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवादी मुजम्मिलनं जानेवारीत या भागाची रेकी केली होती. यावेळी त्याचा साथीदार डॉ. उमर नबीसुद्धा त्याच्यासोबत असल्याचं समोर आलं आहे. तर मुंबईतील २६/११ सारखा दिल्लीत स्फोट घडवण्याचा डॉ. उमरचा कट होता. म्हणूनच त्यानं मोठ्या प्रमाणात स्फोटकं जमा केली होती, असं दिल्ली पोलिसांच्या स्पशेल सेलच्या तपासातून समोर आलं आहे. 6 डिसेंबरला त्यांना हा स्फोट घडवायचा होता अशी माहिती समोर आली आहे.
देशातील गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठी दहशतवादी घटना टळली आहे. फरिदाबादमधील व्हाईट-कॉलर दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य देशातील चार वेगवेगळ्या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांचा हा कट यशस्वीरित्या उधळून लावला आहे.
४ ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडवण्याची योजना:
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाच्या सुरू असलेल्या तपासणीदरम्यान या कटकारस्थानाचा पर्दाफाश झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फरिदाबाद येथील या दहशतवादी मॉड्यूलच्या किमान आठ सदस्यांची निवड देशातील चार वेगवेगळ्या शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्यासाठी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान अटक केलेल्या आरोपींनी या संपूर्ण योजनेचा खुलासा केला आहे.
advertisement
सूत्रांनुसार, हल्ल्यासाठी प्रत्येकी दोन सदस्यांचे असे चार गट तयार करण्यात आले होते. या सर्व गटांना IED पुरवले जाणार होते. योजनेनुसार, या सर्व गटांनी एकाच वेळी स्फोट घडवून आणायचे होते. मात्र, IED बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि आरोपींना पोलिसांनी वेळेवर अटक केल्यामुळे, चार ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरला. संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी आणि मॉड्यूलमधील इतर सदस्यांना पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांनी गुप्तचर यंत्रणा आणि देशाच्या सुरक्षा प्रणालीने हा दहशतवादी कट कशा प्रकारे यशस्वीपणे उधळला, याबद्दल मंत्रिमंडळ सदस्यांना माहिती दिली. यानंतर, मंत्रिमंडळाने सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेचे आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचे जोरदार कौतुक केले. यावेळी दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणावरही चर्चा झाली आणि मंत्रिमंडळात तसा ठराव मंजूर करण्यात आला.
advertisement
दिल्ली लाल किल्ला स्फोट
सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी, जुनी दिल्लीतील गर्दीच्या सुभाष मार्गावर लाल दिव्यावर थांबलेली एक पांढरी ह्युंदाई आय २० (Hyundai i20) कार काही सेकंदात स्फोटात उडाली, ज्यामुळे संपूर्ण देशात धक्कादायक वातावरण निर्माण झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, अनेक वाहनांनी आग पकडली आणि लोक दूरवर फेकले गेले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये रस्त्यावर विच्छिन्न मृतदेह पडलेले दिसत होते. या स्फोटामुळे देशात खळबळ उडाली होती.
advertisement
या घटनेच्या काही तास आधी, हरियाणा पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता आणि डॉ. आदिल अहमद राथर व डॉ. मुजम्मिल शकिल यांना अटक केली होती. हे दोघे १० नोव्हेंबरच्या स्फोटातील आत्मघाती बॉम्बर डॉ. उमर नबी यांचे निकटवर्तीय होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 12:30 PM IST


