रोज तसले Video पाहायचा, पत्नीकडेही तशीच मागणी करायचा, महादेवीचा संताप उसळला, मुसळ डोक्यात घालून पतीचा मर्डर

Last Updated:

पती-पत्नीच्या घरगुती भांडणाचा शेवट हत्येमध्ये झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केपीटीसीएल कर्मचारी असलेल्या 50 वर्षांच्या रमेशची त्याच्या राहत्या घरामध्येच हत्या करण्यात आली.

रोज तसले Video पाहायचा, पत्नीकडेही तशीच मागणी करायचा, महादेवीचा संताप उसळला, मुसळ डोक्यात घालून पतीचा मर्डर (AI Image)
रोज तसले Video पाहायचा, पत्नीकडेही तशीच मागणी करायचा, महादेवीचा संताप उसळला, मुसळ डोक्यात घालून पतीचा मर्डर (AI Image)
पती-पत्नीच्या घरगुती भांडणाचा शेवट हत्येमध्ये झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केपीटीसीएल कर्मचारी असलेल्या 50 वर्षांच्या रमेशची त्याच्या राहत्या घरामध्येच हत्या करण्यात आली. घरामध्ये रमेशचं त्याची पत्नी महादेवीसोबत कडाक्याचं भांडण झालं, यानंतर महादेवीने पतीला लाकडाच्या मुसळ्याने मारहाण केली, ज्यात रमेशचा मृत्यू झाला.
रमेश आणि महादेवी हे जोडपं सिंचन विभागाच्या लेआऊटमध्ये राहत होतं. घटनेच्या रात्री शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून मोठ्या वाद होत असल्याचं ऐकू आलं. रमेशने महादेवीला मारहाण केल्यामुळे हे भांडण वाढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर संतापलेल्या महादेवीने लाकडी मुसळ्याने रमेशवर हल्ला केला, यानंतर रमेश जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
पैशांचा वाद ते अश्लिल व्हिडिओ
advertisement
रमेश आणि महादेवी यांच्यात पैशांवरून भांडण झाल्याचं सुरूवातीला समोर आलं. रमेश हा केपीटीसीएलमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत होता, तिथे त्याला चांगला पगार मिळत होता, पण त्याने कुटुंबाला फक्त 2 हजार रुपये दिले. रमेशला दुबईमध्ये काम करणारा त्याचा मुलगाही पैसे पाठवायचा, पण हे पैसे कुठे वापरायचे, यावरून रमेश आणि महादेवी यांच्यात कायमच वाद व्हायचे.
advertisement
पोलीस तपासामध्ये फक्त पैसेच नाही तर अश्लिल व्हिडिओचा ऍन्गलही समोर आला आहे. रमेश हा अनेकदा पत्नीला अश्लिल व्हिडिओ दाखवायचा. या व्हिडिओमध्ये दिसतंय त्याचं अनुकरण कर, यासाठी तो पत्नीवर दबाव आणायचा, असंही तपासात समोर आलं आहे. रमेशच्या या वर्तनामुळे घरात रोज भांडणं होत असल्याचा दावा नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी केला आहे.
महादेवी रमेशचा हा छळ अनेक वर्ष सहन करत होती. अश्लिल व्हिडिओ पाहून रमेशच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. सततच्या दबावामुळे मी मानसिकदृष्ट्या थकले होते, हत्येच्या दिवशी त्याचा छळ इतका वाढला की माझा राग अनावर झाला आणि मी त्याला हिंसकपणे मारहाण करू लागले, असं महादेवीने पोलीस तपासात कबूल केलं आहे.
advertisement
कर्नाटकच्या मुनीराबादमध्ये घडलेल्या या घटनेमुळे आसपासच्या रहिवाशांना धक्का बसला आहे. रमेशची नोकरी चांगली होती, तसंच त्याला समाजात प्रतिष्ठा होती, पण त्याचं दाराआडचं जीवन कौटुंबिक संघर्षाने भरलेलं होतं. आर्थिक वाद आणि लैंगिक छळ या दोन कारणांमुळे रमेशची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी पोलिसांनी रमेशची पत्नी महादेवीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
चिक्काबल्लापूरमध्ये तरुणीने आयुष्य संपवलं
दुसरीकडे त्याच दिवशी चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील बागेपल्ली तालुक्यातल्या यल्लमपल्ली गावात 26 वर्षांच्या शोभाने जीवन संपवलं. गृहिणी असलेल्या शोभाने घरगुती वादातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना घडली तेव्हा शोभा घरात एकटीच होती. बागेपल्ली ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या/देश/
रोज तसले Video पाहायचा, पत्नीकडेही तशीच मागणी करायचा, महादेवीचा संताप उसळला, मुसळ डोक्यात घालून पतीचा मर्डर
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement