पाकिस्तानच्या तोफगोळ्याच्या माऱ्यात भारताच्या बड्या अधिकाऱ्याचा मृत्यू, जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण

Last Updated:

Rajouri Official Raj Kumar Thappa: जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा यांच्या घरावर पाकिस्तानने तोफगोळा डागला.

राजकुमार थापा यांचे निधन
राजकुमार थापा यांचे निधन
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानकडून भारतावर सतत ड्रोन हल्ले सुरू आहेत तसेच सीमाभागांतही बेछूट गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्यदलाचे जवान पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देत आहेत. यादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये एका बड्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा यांच्या घरावर पाकिस्तानने तोफगोळा डागला. या तोफगोळ्याचा स्फोट झाल्याने राज कुमार थापा गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह दोन नागरिकही जखमी झाले
जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानच्या गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थप्पा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 'एक्स'वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. राजौरी शहरातील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त राजकुमार थापा आणि त्यांचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी शासकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement

कोण होते राज कुमार थापा?

राज कुमार थापा हे राजौरी येथे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. धडाडीने काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी राबणारे म्हणूनही त्यांची ओळख होती.

बडे अधिकारी राज कुमार थापा यांच्या निधनाने मुख्यमंत्री अब्दुल्ला हळहळले

थापा यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला. अब्दुल्ला म्हणाले,"राजौरीहून दुर्दैवी बातमी आली आहे. आपण जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याचा दौरा करत होते तसेच माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला देखील ते उपस्थित होते."
advertisement
जम्मू काश्मीर राज्यातील अधिकाऱ्यांच्या घरावर तोफगोळ्याचा मारा करण्यात आला. ज्यामध्ये अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांना वीरमरण आले. त्यांच्या निधानाबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, असे अब्दुल्ला म्हणाले.
मराठी बातम्या/देश/
पाकिस्तानच्या तोफगोळ्याच्या माऱ्यात भारताच्या बड्या अधिकाऱ्याचा मृत्यू, जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement