दिल्लीसह 4 राज्यात हाय अलर्ट, 26 तारखेच्या आधी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; IBने यावेळी स्पष्ट सांगितले कोण करणार हल्ला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
High Alert: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये दहशतवादी धोक्याची शक्यता लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. खलिस्तानी आणि परदेशस्थित दहशतवादी नेटवर्क गुन्हेगारी टोळ्यांच्या मदतीने हल्ल्याचा कट रचत असल्याच्या इशाऱ्यांमुळे सुरक्षायंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत.
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरांबाबत भारतीय गुप्तचर संस्थांनी हाय अलर्ट जारी केला आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB)शी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, बंदी घातलेले खलिस्तानी तसेच बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना दिल्लीसह प्रमुख शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात.
ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पंजाबमधील काही कुख्यात गँगस्टर परदेशातून कार्यरत खलिस्तानी आणि कट्टरपंथी हँडलर्ससाठी ‘फूट सोल्जर’ म्हणून काम करत आहेत. भारताची अंतर्गत सुरक्षा कमकुवत करण्यासाठी आणि आपला अजेंडा राबवण्यासाठी हे हँडलर्स गुन्हेगारी नेटवर्कचा वापर करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
गुप्तचर अहवालानुसार हे गँगस्टर हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या भागांमध्ये सक्रिय असून त्यांचा खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संपर्क हळूहळू वाढत आहे. दिल्लीमध्ये यापूर्वी 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्या आहेत.
advertisement
राजधानीत सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल
26 जानेवारी रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या नॉर्थ डिस्ट्रिक्टने संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी मॉक ड्रिल घेतली. याआधी लाल किल्ला, ISBT कश्मीरी गेट, चांदणी चौक आणि मेट्रो स्थानकांवरही अशा सराव मोहिमा राबवण्यात आल्या.
या मॉक ड्रिलचा उद्देश दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या तयारीची चाचणी घेणे, तसेच संबंधित यंत्रणा आणि नागरिकांना सतर्क करणे हा होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 3:36 PM IST
मराठी बातम्या/देश/
दिल्लीसह 4 राज्यात हाय अलर्ट, 26 तारखेच्या आधी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; IBने यावेळी स्पष्ट सांगितले कोण करणार हल्ला









