मन सुन्न करणारा VIDEO, अंगावर वर्दी डोळ्यात पाणी हाताता फोटो, ले. कर्नल पत्नीचा पायलट नवऱ्याला अखेरचा निरोप
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लेफ्टिनेंट कर्नल राजवीर सिंह चौहान यांचा केदारनाथ येथे हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी लेफ्टिनेंट कर्नल दीपिका चौहान यांनी वर्दी घालून पतीला शेवटचा निरोप दिला.
आपल्या जवळची व्यक्ती जरा दूर गेली तर मनात काहूर उठतो, या महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देशसेवा करणाऱ्या महिलेसोबत नियतीनं इतका क्रूर खेळ केला की दोन क्षणांचा आनंदही जगण्याची संधी दिली नाही. 15 वर्षांनंतर तिची कुस उजवली होती, घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र अचानक फोन वाजला आणि होत्याचं नव्हतं झालं. पायलट नवऱ्याच्या निधनाची बातमी आली. सारी स्वप्न एका क्षणात मातीमोल झाली.
उत्तराखंडमधील केदारनाथ इथे फादर्स डेच्या दिवशी म्हणजेच 15 जून रोजी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये पायलट रिटायर लेफ्टिनेंट कर्नल राजवीर सिंह चौहान यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच चौहान कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रिटायर लेफ्टिनेंट कर्नल राजवीर सिंह यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.
रिटायर लेफ्टिनेंट कर्नल राजवीर सिंह यांची पत्नी लेफ्टिनेंट कर्नल दीपिका चौहान अंगावर वर्दी डोळ्यात पाणी आणि हातात फोटो घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या. पतीला शेवटचा निरोप देताना त्यांनी जे केलं ते पाहून कुटुंबीय, नातेवाईकांचाही धीर सुटला. पाणावलेल्या डोळ्यांनी सगळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
advertisement
#WATCH | Jaipur, Rajasthan: Lt Colonel Rajveer Singh Chauhan (Retd) was one of the seven people who died in a helicopter crash in Kedarnath, Uttarakhand on June 15.
Visuals from Shastri Nagar as his wife, Lt Colonel Deepika Chauhan, Rajasthan Minister Rajyavardhan Singh Rathore… pic.twitter.com/iudUvCoHhM
— ANI (@ANI) June 17, 2025
advertisement
लेफ्टनंट कर्नल राजवीर यांना अंतिम निरोप देण्यासाठी राजस्थानचे मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड हे देखील अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंत्ययात्रेतलं हे दश्यं मन हेलावून टाकणारं आहे. लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांनी अंगावर युनिफॉर्म घालून आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला आहे.
Location :
Jaipur,Rajasthan
First Published :
June 17, 2025 10:41 AM IST
मराठी बातम्या/देश/
मन सुन्न करणारा VIDEO, अंगावर वर्दी डोळ्यात पाणी हाताता फोटो, ले. कर्नल पत्नीचा पायलट नवऱ्याला अखेरचा निरोप