'न्यूज18 इंडिया' हिंदी बातम्यांमध्ये नंबर वन; 'आज तक'ला टाकले मागे
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
'न्यूज18 इंडिया' सलग तीन वर्षे हिंदी बातम्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाक संघर्षाच्या कव्हरेजमुळे त्यांनी दर्शकांचा विश्वास जिंकला आहे.
नवी दिल्ली: ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (BARC) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 'न्यूज18 इंडिया' हिंदी बातम्यांच्या श्रेणीमध्ये दर्शकांची पहिली पसंती ठरले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय घटनांदरम्यान वस्तुस्थितीवर आधारित आणि रिअल-टाइम रिपोर्टिंगमुळे या चॅनलने देशभरातील लाखो लोकांचा विश्वास कायम राखला आहे.
तीन वर्षांपासून अव्वल स्थान कायम
'न्यूज18 इंडिया'ने सलग तीन वर्षांपासून आपले पहिले स्थान कायम राखले आहे. सखोल विश्लेषण आणि आकर्षक बातम्यांच्या कव्हरेजसह ते सातत्याने महत्त्वपूर्ण बातम्या सादर करत आहे. मागील तीन वर्षांपासून 'न्यूज18 इंडिया'ने आपल्या सर्व प्रतिस्पर्धकांपेक्षा लक्षणीय आघाडी कायम ठेवली आहे. 78,179 AMA'000s सह ते आघाडीवर आहे. तर त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी 'आज तक' 72,964 AMA'000s सह मागे आहे. (Source: BARC |Metric: Cume Reach 000s | TG: NCCS All 2+ | Period: Wk 20'22-19'25, 24 Hrs, All Days |Market: All India)
advertisement
'न्यूज18 इंडिया'चे अतुलनीय कव्हरेज, महत्त्वपूर्ण बातम्या सादर करण्याची आणि विविध दृष्टिकोन मांडण्याची क्षमता, यामुळे त्याला इतरांपासून वेगळे करते. 5,92,801 च्या उल्लेखनीय एकत्रित पोहोचसह 'न्यूज18 इंडिया'ने 'आज तक'च्या 5,77,077 ला मागे टाकले आहे. ज्यामुळे त्याची निर्णायक आघाडी दिसून येते. (Source: BARC |Metric: Gross AMA'000s | TG: NCCS All 15+ | Period: 22nd Apr-16th May'25, 24 Hrs |Market:HSM)
advertisement
दहशतवादी हल्ल्यापासून युद्धाबंदीपर्यंत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून ते भारत-पाकिस्तान संघर्षाच्या शेवटापर्यंत (22 एप्रिल - 16 मे '25) 'न्यूज18 इंडिया'ने 'आज तक'वर लक्षणीय आघाडी घेतली. न्यूज18 इंडियाचे 3,56,249 AMA'000s होते तर आज तक 3,43,934 AMA'000s सह खूप मागे होते.(Source: BARC |Metric: Cume Reach'000s | TG: NCCS All 2+ | Period: 22nd Apr-16th May'25, 24 Hrs |Market:HSM)
advertisement
देशात युद्धजन्य परिस्थिती असताना 'न्यूज18 इंडिया'ने सातत्यपूर्ण अचूकतेसह वस्तुस्थितीवर आधारित अहवाल सादर केले. ज्यामुळे मोठ्या संख्येने दर्शक या चॅनलकडे वळले. 'न्यूज18 इंडिया'ची एकत्रित पोहोच 2,03,774 इतकी प्रचंड होती. तर 'आज तक' 1,85,359 सह मागे होते. (Source: BARC |Metric: Cume Reach'000s | TG: NCCS All 2+ | Period: 22nd Apr-16th May'25, 24 Hrs |Market:HSM)
advertisement
भारत-पाकिस्तान संघर्ष आणि युद्धविराम
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान इतर चॅनल खोट्या बातम्या दाखवत असताना 'न्यूज18 इंडिया'ने महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह बातम्या देणे सुरू ठेवले. पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) यांनी युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या भारतीय समकक्षांशी संपर्क साधल्याची बातमी देणारे हे पहिले चॅनल होते. 'न्यूज18 इंडिया'च्या वस्तुनिष्ठ आणि वेळेवर केलेल्या रिपोर्टिंगला दर्शकांनी प्रतिसाद दिला.ज्यामुळे त्यांची नंबर वन बातमी स्रोत म्हणूनची भूमिका पुन्हा एकदा सिद्ध झाली. भारताच्या DGMO च्या पत्रकार परिषदेदरम्यान 'न्यूज18 इंडिया'ने 665 AMA'000s मिळवले. तर 'आज तक' 650 AMA'000s सह मागे होते. (Source: BARC |Metric: AMA'000s | TG: NCCS All 15+ | Period: 11th May (18:33-19:45 Hrs) & 12th May (14:31-15:08 Hrs) |Market:HSM)
advertisement
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान संघर्ष यांसारख्या घटनांदरम्यान 'न्यूज18 इंडिया'ने आपल्या सखोल कव्हरेजसह देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोच साधली. खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीच्या वेगाने प्रसाराच्या युगात 'न्यूज18 इंडिया'चे कव्हरेज सातत्याने वस्तुनिष्ठ, विश्वासार्ह आणि अचूक राहिले आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय घटनांदरम्यान ते दर्शकांसाठी नेहमीच सर्वोच्च पसंतीचे आणि सर्वात विश्वसनीय हिंदी बातमी चॅनल बनले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 26, 2025 3:20 PM IST