पाकिस्तान, काहीही करा पण आधी भारताचा 'न्यू नॉर्मल' समूजन घ्या; नाही तर अस्तित्व संपुष्टात येईल

Last Updated:

PM Modi: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याचे सांगितले.

News18
News18
नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर दोन्ही देशातील तणाव कमी झाला आहे. मात्र संघर्ष पुन्हा होणार की नाही ही गोष्ट फक्त आणि फक्त पाकिस्तानच्या हातात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरनंतर ते प्रथमच देशाला उद्देशून बोलत होते. मोदी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशाराच दिला आहे की, पुन्हा जर दहशतवादी कृत्य झाले तर भारत उत्तर देण्यास पुढे मागे पाहणार नाही.
मित्रांनो, भारताची तिन्ही सैन्यदले, आपले हवाई दल, आपले सैन्य आणि आपली नौदल, आपले सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि आपले निमलष्करी दल सतत सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाविरोधात भारताची नीती आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधातील लढाईत एक नवीन रेषा आखली आहे. एक नवीन मापदंड, एक नवीन सामान्य स्थिती (न्यू नॉर्मल) निश्चित केली आहे.
advertisement
पहिले- भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. आपण आपल्या पद्धतीने, आपल्या अटींवर उत्तर देऊ. दहशतवादाची मुळे जिथे उगवतात, तिथे जाऊन आपण कठोर कारवाई करू.
दुसरे- कोणताही अणुधमकी (न्यूक्लियर ब्लॅकमेल) भारत सहन करणार नाही. अणुधमकीच्या आडून वाढत असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल.
तिसरे- आपण दहशतवादाला आश्रय देणाऱ्या सरकारला आणि दहशतवादी म्होरक्यांना वेगळे पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, जगाने पाकिस्तानचे ते घृणास्पद सत्य पुन्हा पाहिले. जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे मोठे अधिकारी जमले होते. राज्य प्रायोजित दहशतवादाचा हा खूप मोठा पुरावा आहे. भारत आणि आपल्या नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी आपण सतत निर्णायक पावले उचलत राहू.
advertisement
मोदी पुढे म्हणाले, युद्धाच्या मैदानात आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानला धूळ चारली आहे. आणि यावेळी ऑपरेशन सिंदूरने नवीन आयाम जोडला आहे. आपण वाळवंटात आणि डोंगरांमध्ये आपल्या क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि त्याचबरोबर नवीन युगातील युद्धातही (न्यू एज वॉरफेअर) आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. या ऑपरेशनदरम्यान, आपल्या 'मेड इन इंडिया' शस्त्रांची सत्यता सिद्ध झाली आहे. 21 व्या शतकाच्या युद्धात 'मेड इन इंडिया' संरक्षण उपकरणांची वेळ आली आहे, हे आज जग पाहत आहे.
advertisement
पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवेल. पाकिस्तानला वाचायचे असेल, तर त्याला आपली दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करावी लागेल. याशिवाय शांततेचा दुसरा कोणताही मार्ग नाही. भारताची भूमिका एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. आणि पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही.
advertisement
आज मी जागतिक समुदायालाही सांगेन, आमचे घोषित धोरण आहे. जर पाकिस्तानशी बोलणे झाले, तर ते फक्त दहशतवादावरच होईल. जर पाकिस्तानशी बोलणे झाले, तर ते फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) वरच होईल.
मराठी बातम्या/देश/
पाकिस्तान, काहीही करा पण आधी भारताचा 'न्यू नॉर्मल' समूजन घ्या; नाही तर अस्तित्व संपुष्टात येईल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement