Pahalgam Attack : गुप्तचरांकडून हल्ल्याचा अलर्ट, झाडाझडती झाली, तरीही 26 जणांचा बळी का? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

Pahalgam Attack : पर्यटकांना दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

News18
News18
श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तर, दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर गुप्तचर संस्थांना या हल्ल्याची माहिती नव्हती का, याची चर्चा सुरू झाली होती. आता मात्र, महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पर्यटकांना दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

गुप्तचरांनी काय माहिती दिली होती?

दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या उपनगरांमध्ये विशेषतः झबरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये, थांबलेल्या पर्यटकांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर त्या भागातील सुरक्षेत वाढ करून डाचीगाम, निशात परिसरात मोठ्या प्रमाणावर झडती घेण्यात आली. मात्र काही संशयास्पद न आढळल्याने ही मोहीम २२ एप्रिल रोजी थांबविण्यात आली. नेमके त्याच दिवशी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन घाटीत पर्यटकांवर गोळीबार करून २६ जणांची हत्या केली.
advertisement
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, बैसरन येथे दोन स्थानिक दहशतवादी पर्यटकांमध्ये मिसळले. त्यांनी गोळीबार करून काही पर्यटकांना एका फूड कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये नेले. त्या ठिकाणी आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. त्यांनी मिळून 26 जणांची हत्या केली.

हल्ल्याचा हेतू काय?

दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार करण्याआधी त्यांचा धर्म विचारला असल्याची माहिती समोर आली. त्याशिवाय, पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले नव्हते. या अधिकाऱ्याने पर्यटकांवरील हल्ल्याचे कारण सांगितले की, लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि देशात इतर ठिकाणी स्थानिक लोकांकडून काश्मिरी नागरिकांवर हल्ले व्हावेत, या हेतूंदेखील हा दहशतवादी हल्ला करण्यात आला
मराठी बातम्या/देश/
Pahalgam Attack : गुप्तचरांकडून हल्ल्याचा अलर्ट, झाडाझडती झाली, तरीही 26 जणांचा बळी का? समोर आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement