डोनाल्ड ट्रम्पचे ऐकले नाही, 3 तासात पाकिस्तानचे शेपूट वाकडे; LOCवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणली, पण ४ तासातच पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. त्यामुळे भारताच्या कारवाईची उत्सुकता आहे.
नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करून शस्त्रसंधी घडवून आणली. त्यानंतर दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवली होती. विशेष म्हणजे या घटनेनंतर दोन्ही देशांनी पत्रकार परिषद करून तसे जाहीर देखील घेतले. मात्र कुरापती खोर पाकिस्तान कधी सुधारणार नाही.
शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर फक्त ४ तासात पाकिस्तानकडून पुन्हा LOCवर गोळीबार करण्यात आला. इतक नाही तर पाकिस्तानमध्येचे ड्रोन देखील भारतीय हद्दीत दिसून आले आहेत. त्यामुळे आता भारताकडून काय कारवाई केली जाते याची उत्सुकता लागली आहे. कारण शस्त्रसंधीच्या पत्रकार परिषदेत भारताने स्पष्टपणे म्हटले होते की, जर पाकिस्तानकडून काही आगळीक झाली तर भारत त्याला चोख उत्तर देणार.
advertisement
शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर हायलेव्हल बैठक झाली होती. ही बैठक संपल्यानंतर काही मिनिटात जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारामुळे लोकांनी घरातील लाइट्स बंद केल्या. त्यानंतर प्रशासनाकडून या परिसरातील वीज बंद करण्यात आली. बारामुल्ला, उधमपूर आणि कठुआ येथे सध्या पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
advertisement
अब्दुला संतापले...
पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. युद्धबंदीचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले!!!, अशा शब्दात अब्दुला यांनी संताप व्यक्त केला आहे.
What the hell just happened to the ceasefire? Explosions heard across Srinagar!!!
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
advertisement
दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाला कडक प्रत्युत्तर देण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला परवानगी देण्यात आल्याचे भारत सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 8:57 PM IST
मराठी बातम्या/देश/
डोनाल्ड ट्रम्पचे ऐकले नाही, 3 तासात पाकिस्तानचे शेपूट वाकडे; LOCवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले