PM Modi At Airbase : चेहऱ्यावर करारीपणा, कपाळी त्रिशूळ आणि मागे लिहिलेली कॅप्शन, पीएम मोदींच्या फोटोने पाकला संदेश
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
PM Modi At Air base : पंतप्रधान मोदी यांच्या एका फोटोची सर्वाधिक चर्चा होत आहे. या फोटोतून पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला कठोर संदेश दिला असल्याची चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाच्या जवानांनी जबरदस्त कामगिरी करत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. या मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे आदमपूर हवाई तळाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन करताना कौतुकाची थाप दिली. पंतप्रधान मोदी यांनी हवाई दलाच्या जवानांसोबत फोटो काढले. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या एका फोटोची सर्वाधिक चर्चा होत आहे. या फोटोतून पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला कठोर संदेश दिला असल्याची चर्चा सुरू आहे.
आदमपूर हवाई तळ हे पंजाबमधील महत्त्वाचे हवाई तळ आहे. याच हवाई तळावर तैनात असलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. याच ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले होते. पंतप्रधान मोदी यांनी अचानकपणे आज आदमपूर हवाई तळाला भेट दिली. आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला भेट दिली.
आदमपूर हवाई तळावर पंतप्रधान मोदी यांनी अचानक भेट दिल्याने हवाई दलाच्या जवानांमध्ये आणखी उत्साह वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान मोदी यांनी हवाई दलाच्या जवानांना सोबत संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला जोरदार तडाखा देण्यात आला. त्यानंतर बिथरलेल्या पाकने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात आदमपूर हवाई तळाने मोठी कामगिरी बजावली.
advertisement
ऑपरेशन सिंदू्रमधील हिरोंसोबतच्या इतर सैनिकांसोबत पंतप्रधान मोदींच्या भेटीचे फोटो आता समोर आले आहे. या फोटोमुळे पाकिस्तान अधिकच अस्वस्थ झालं आहे. हवाई दलाच्या जवानांसोबत पंतप्रधान मोदींचा हा फोटो केवळ एक फोटो नाही तर पाकिस्तानला एक कडक संदेश आहे. पंतप्रधान मोदींवरील चेहऱ्यावरील करारीपणा, कपाळावर त्रिशूळ आणि त्यामागे असलेल्या भिंतीवरील ओळी, यामुळे फोटोची चर्चा सुरू आहे.
advertisement

पंतप्रधान मोदींचा हा फोटो पाकिस्तान आणि दहशतवाद्यांसाठी एक संदेश आहे. त्यामागे भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे चित्र आहे, एक लढाऊ विमान. त्यावर एक ओळ लिहिलेली आहे, जी पाकिस्तानसाठी थेट संदेश आहे. त्यावर लिहिले आहे Why Enemy Pilots Don’t Dleep Well. याचे उत्तर म्हणजे भारतीय हवाई दल आणि त्यांची लढाऊ विमाने असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
आदमपूर हवाई तळ हे पंजाबमधील महत्त्वाचे हवाई तळ आहे. याच हवाई तळावर तैनात असलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. याच ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
May 13, 2025 1:40 PM IST
मराठी बातम्या/देश/
PM Modi At Airbase : चेहऱ्यावर करारीपणा, कपाळी त्रिशूळ आणि मागे लिहिलेली कॅप्शन, पीएम मोदींच्या फोटोने पाकला संदेश