PM Narendra Modi Speech: १०० दहशतवाद्यांना ठार मारलं, पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन LIVE
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (12 मे) रात्री 8 वाजता देशाला संबोधित करत आहे. या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती दिली. गेल्या काही दिवसात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लष्करी संघर्षावर पंतप्रधान भाष्य करतील. तसेच केंद्र सरकारची भूमिका देखील स्पष्ट करतील. देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं.
Address to the nation. https://t.co/iKjEJvlciR
— Narendra Modi (@narendramodi) May 12, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले होते. दोन्ही देशात १८ दिवसांच्या संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधी झाली आहे. भारतीय लष्कराने सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन इंडियन आर्मीने कशी कारवाई केली याची माहिती दिली. आता पंतप्रधान मोदी स्वत: या सर्व विषयांवर बोलण्याची शक्यता आहे.
advertisement
'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर हे त्यांचे पहिले राष्ट्रव्यापी भाषण आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जमिनी, हवाई आणि सागरी सीमांवरील सर्व प्रकारच्या गोळीबार आणि लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्याच्या करारावर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. हा करार चार दिवसांच्या सीमेपलीकडील हल्ल्यानंतर झाला आहे. ज्यामुळे मोठ्या संघर्षाची भीती निर्माण झाली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारताने 6 आणि 7 मेच्या रात्री 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. ज्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने 8, 9 आणि 10 मे रोजी अनेक भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
भारतीय सशस्त्र दलांनी राफिक, मुरीद, चकलाल, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियनसह अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर जोरदार प्रतिहल्ला केला. पसरूर आणि सियालकोट विमानतळावरील रडार साइट्सनाही अचूक शस्त्रांचा वापर करून लक्ष्य करण्यात आले. ज्यामुळे शेजारील देशाला मोठे नुकसान झाले. लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, या लढाईत 35-40 पाकिस्तानी लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत आणि नवी दिल्लीने आपले उद्दिष्ट साध्य केले आहे.
advertisement
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत पंतप्रधान मोदींचे हे भाषण महत्त्वाचे मानले जात आहे. ते या भाषणात शांतता आणि सौहार्दाचा संदेश देतील, अशी शक्यता आहे. तसेच 'ऑपरेशन सिंदूर' आणि त्यानंतरच्या घटनांवर ते सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 12, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/देश/
PM Narendra Modi Speech: १०० दहशतवाद्यांना ठार मारलं, पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन LIVE