Indore Couple Missing: 'सोनम-राजमध्ये प्रेमसंबंध नव्हते, तर...', कुशवाहच्या बहिणीकडून भलताच खुलासा

Last Updated:

Indore Couple Missing : इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या राज कुशवाहच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

News18
News18
Indore Couple Missing Case: मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी अलीकडेच हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेले होते. हनिमूनदरम्यान राजाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पत्नी सोनम रघुवंशीला अटक केल्यानंतर विविध खुलासे समोर येत आहेत. सोनमनेच आपला प्रियकर राज कुशवाह याला हाताशी धरून राजाची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. राजने आपल्या तीन मित्रांना सुपारी देऊन हे हत्याकांड घडवल्याचं देखील समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह तिचा प्रियकर राज आणि इतर तीन जणांना अटक केली आहे. या पाचही जणांची चौकशी केली असता याबाबत विविध खुलासे समोर येत आहेत.
याबाबत आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या राज कुशवाहच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपला भाऊ निर्दोष आहे. तो असं करूच शकत नाही, असा दावा तिने केला आहे. शिवाय तिने सोनम आणि राजच्या रिलेशनबाबत खोटी थेअरी मांडली जात असल्याचा देखील दावा केला आहे.

माझा भाऊ सोनमला दिदी म्हणायचा- राज कुशवाहची बहीण

advertisement
"माझा भाऊ हे करूच शकत नाही. राजला या कटात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो अजिबात कुणाची हत्या करू शकत नाही. सोनमसोबतच्या प्रेमसंबंधाबाबत विचारलं असता राजच्या बहिणीने भलताच खुलासा केला आहे. 'माझा भाऊ सोनमसोबत रिलेशनशिपमध्ये कसा काय असू शकतो? तो सोनमला दीदी म्हणायचा. दोघांमध्ये नोकर-मालकाचे नाते होते. अशा परिस्थितीत दोघेजण प्रेमसंबंधात होते, अशी थेअरी कशी काय मांडू शकता? असा सवालही राजच्या बहिणीने विचारला आहे.
advertisement
आरोपी राज कुशवाहाच्या बहिणीने पुढे म्हटलं की, 'माझा भाऊ राजला फसवण्यात आले आहे. माझा भाऊ हे करू शकत नाही. माझा भाऊ अडीच वर्षांपासून तिथे काम करत होता. परवा माझा भाऊ सकाळी ६ वाजता आला. त्याने सांगितले की त्याला नवीन कपडे घालून मंदिरात जायचे आहे. आम्ही राजा भैयाच्या (राजा रघुवंशी) भावाला विनंती करतो की, त्यांनी माझ्या भावाला (राज कुशवाह) वाचवावं. तो निर्दोष आहे.
मराठी बातम्या/देश/
Indore Couple Missing: 'सोनम-राजमध्ये प्रेमसंबंध नव्हते, तर...', कुशवाहच्या बहिणीकडून भलताच खुलासा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement