विमानप्रवासात लवकरच मोठा बदल, Flightमध्ये नेहमी घेत असलेली गोष्ट आता होणार बॅन! DGCA लागू करणार नवे नियम

Last Updated:

Power Banks Banned on Flights :भारतामध्ये लवकरच विमानप्रवासाचे नियम बदलणार आहेत. इंडिगोच्या फ्लाइटमध्ये पॉवर बँकला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर DGCA नवी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वं आणण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फ्लाइटमध्ये पॉवर बँक आणि चार्जिंगवर मर्यादा लागू होऊ शकतात.

News18
News18
नवी दिल्ली: लवकरच विमानप्रवासात पॉवर बँक घेऊन जाणे अवघड होऊ शकते. कारण अलीकडेच इंडिगोच्या दिल्लीदीमापूर उड्डाणादरम्यान एका प्रवाशाच्या पॉवर बँकला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेला नागरी विमानवाहतूक नियामक संस्था DGCA (डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) ने अत्यंत गंभीरतेने घेतले असून नव्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांवर (Safety Guidelines) काम सुरू केले आहे.
advertisement
इंडिगोच्या घटनेच्या काही दिवस आधीच एअर चायना (Air China) च्या एका विमानालाही पॉवर बँकमुळे आग लागल्याने मध्यरस्त्यातच डायव्हर्ट (दिशा बदल) करावे लागले होते. या संपूर्ण घडामोडीबद्दल सीएनबीसी आवाजचे रोहन सिंह यांनी माहिती दिली की, DGCA सध्या विमानांत पॉवर बँक वापरावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. या संदर्भात विविध एअरलाईन्स कंपन्या आणि तांत्रिक तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू आहे. त्यांच्या सूचनांच्या आधारे DGCA नवी मार्गदर्शक तत्त्वे (guidelines) तयार करणार आहे.
advertisement
सध्या या प्रस्तावित नियमांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार सुरू आहे.
-प्रवाशांकडे असलेल्या पॉवर बँकच्या संख्येवर मर्यादा (quantity limit)
-विमानप्रवासादरम्यान चार्जिंगवर बंदी
-पॉवर बँक कशी आणि कुठे ठेवायची याबाबतचे स्टोरेज नियम
-तसेच डिव्हाइसवर दिसणारी कॅपेसिटी रेटिंग अनिवार्य करणे इत्यादी.
advertisement
असा अंदाज आहे की, भारतातही परदेशातील नियमांप्रमाणेच फ्लाइटदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करण्यावर बंदी लागू केली जाऊ शकते. मात्र DGCA नवे नियम ठरवण्यापूर्वी प्रवाशांची इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवरील अवलंबित्व (dependence) देखील लक्षात घेणार आहे.
इंडिगोच्या दिल्लीदीमापूर फ्लाइटमधील अपघाताचे मूळही पॉवर बँकमधील शॉर्ट सर्किट आणि आग हेच होते. सध्या जगातील अनेक विमान कंपन्यांनी पॉवर बँकवर आधीच बंदी लागू केली आहे. उदाहरणार्थ: एमिरेट्स एअरलाईन्स मध्ये पॉवर बँक पूर्णपणे बंद आहेत. कॅथे पॅसिफिक आणि कतार एअरवेज यांनी त्यासाठी विशिष्ट मर्यादा ठरवली आहे.
advertisement
सिंगापूर एअरलाईन्स ने केबिनमधील USB पोर्ट्सद्वारे चार्जिंग सेवा बंद केली असून, प्रवाशांना पॉवर बँक सीट पॉकेटमध्ये किंवा सीटखाली ठेवलेल्या बॅगेजमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतामध्येही DGCA कडून लवकरच नव्या अधिकृत मार्गदर्शक सूचना (official guidelines) जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विमान प्रवास करताना पॉवर बँक सोबत नेण्यावर कडक निर्बंध लागू होऊ शकतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
विमानप्रवासात लवकरच मोठा बदल, Flightमध्ये नेहमी घेत असलेली गोष्ट आता होणार बॅन! DGCA लागू करणार नवे नियम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement