पहलगामवर सर्वात महत्त्वाची अपडेट, मोठा सुगावा हाती; दहशतवाद्याचा डेंजर रुट उघड, शोधमोहीम थरारक वळणावर

Last Updated:

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. डेहरा की गली मार्गे भारतात घुसलेल्या दहशतवादी गटाने 2022 पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये मालिका स्वरूपात हल्ले केले असल्याचे समोर आले आहे.

News18
News18
काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे की, या हल्ल्यामागे असलेल्या दहशतवादी गटाने 2022 च्या शेवटी किंवा 2023 च्या सुरुवातीला पूंछ जिल्ह्यातील डेहरा की गली (DKG) मार्गे भारतात घुसखोरी केली होती आणि गेल्या वर्षभरापासून जम्मू विभागात सक्रीय होते.
पूंछमधून सुरुवात – घातपात आणि हालचाली
या दहशतवादी गटाने आपला पहिला मोठा हल्ला 21 डिसेंबर 2023 रोजी सुरनकोटमधील डेहरा की गली, बुफ्लियाझ परिसरात केला होता. ज्यामध्ये चार भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर मे 2024 मध्ये या गटाने सुरनकोटमधील सनईजवळ बक्राबाल मोहल्ल्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला.
पुंछच्या दाट जंगलांमध्ये आणि पर्वतीय भागात काही महिने लपून राहिल्यानंतर हा गट ऑगस्ट-सप्टेंबर 2024 च्या सुमारास बुफ्लियाझ मार्गे काश्मीरमध्ये पोहोचल्याची शक्यता आहे.
advertisement
काश्मीरमध्ये हालचाल
काश्मीरमध्ये पोहोचल्यावर या गटाने दोन उपगटांमध्ये विभागणी केली. एक गुलमर्गच्या दिशेने गेला आणि दुसरा सोनमर्गकडे. 20 ऑक्टोबर रोजी जुनैद नावाच्या स्थानिक दहशतवाद्याने एका पाकिस्तानी साथीदारासोबत सोनमर्गजवळ बाहेरील मजुरांवर गोळीबार केला. काही दिवसांनी 26 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या पथकाने गुलमर्गमध्ये लष्करी ट्रकवर हल्ला केला.
नंतर मोठ्या प्रत्युत्तरात श्रीनगरच्या हरवान भागात जुनैद आणि एक पाकिस्तानी दहशतवादी सुरक्षाबलांनी घेरले. कारवाईत फक्त जुनैद ठार झाला. ही मोहीम पुढील 15 दिवस चालली. त्यानंतर जुनैदच्या फोनमध्ये मिळालेल्या फोटोंमुळे या गटाचे पुंछमधील मागील हल्ल्यांशी थेट संबंध स्पष्ट झाले.
advertisement
पुन्हा एकत्र येऊन पहलगाम हल्ला
तपासातून समोर आले आहे की पहलगाम हल्ल्याआधी हे दोन उपगट पुन्हा एकत्र आले होते. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हापतनार, त्राल आणि डीएच पोरा या तीन ठिकाणांहून संशयास्पद कम्युनिकेशन सिग्नल्स पकडले. ज्यामुळे या गटाचे अधिक विस्तृत नेटवर्क आणि संभाव्य लपण्याच्या जागा समोर आल्या. सूत्रांच्या मते, या सिग्नल्सचा हेतू शोधमोहीम भटकवणे असावा.
advertisement
डोंगराळ मार्गांचा वापर – रस्त्यांपासून दूर
या तपासातील एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे या दहशतवादी गटाने फक्त पर्वतीय मार्गांचा वापर केला आणि रस्त्यांपासून पूर्णतः दूर राहून हालचाली केल्या. या गुंतागुंतीच्या पर्वतरांगा त्यांना लपण्यासाठी आणि पुन्हा एकत्र होण्यासाठी उपयुक्त ठरल्या. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांसाठी त्यांचा माग काढणे अधिक कठीण झाले.
आता जेव्हा या गटाच्या हल्ल्यांची पद्धत स्पष्ट होत चालली आहे. तेव्हा सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी मोहिमा अधिक तीव्र केल्या असून या अत्यंत चपळ आणि घातक गटाचे उरलेले सदस्य संपवण्यावर भर दिला जात आहे.
मराठी बातम्या/देश/
पहलगामवर सर्वात महत्त्वाची अपडेट, मोठा सुगावा हाती; दहशतवाद्याचा डेंजर रुट उघड, शोधमोहीम थरारक वळणावर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement