“सरकारकडून बोलतोय…” एवढंच ऐकलं; Digital Arrest अंगावर काटा आणणारा प्रकार, पोलिसही थक्क
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Shocking Incident: सायबर गुन्हेगारीच्या थरारक प्रकाराने देशभरात खळबळ माजवली आहे. 72 वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला सरकारी अधिकारी बनून फसवणूक करणाऱ्यांनी तब्बल 52 कोटी रुपयांनी लुटले.
नवी दिल्ली: 72 वर्षीय निवृत्त औषधनिर्माण कंपनीतील कर्मचाऱ्याला शासकीय अधिकारी आणि तपास अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांनी तब्बल 52 कोटी रुपयांचा गंडा घातला. सायबर गुन्ह्याच्या एका धक्कादायक प्रकरणात
ही फसवणूक तेव्हा सुरू झाली जेव्हा पीडित व्यक्तीला एका व्यक्तीकडून व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला एका सरकारी संस्थेशी संबंधित अधिकारी म्हणून ओळख करून दिली. त्याने पीडित व्यक्तीवर मनी लॉन्डरिंग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आणि त्याने परदेशात अवैधरित्या पैसे हस्तांतरित केल्याचे सांगितले.
advertisement
फसवणूक करणाऱ्याने पुढे दावा केला की- अधिकाऱ्यांनी त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याची आणि बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर त्या वरिष्ठ नागरिकाला सांगण्यात आले की, त्याने आपले सर्व पैसे एका तथाकथित शासकीय बँक खात्यात जमा करावेत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम परत केली जाईल.
advertisement
पुढील 40 दिवस आरोपींनी पीडित व्यक्तीला सतत त्रास दिला. त्यांनी बनावट न्यायालय आणि पोलिस ठाण्याचे सेटअप तयार करून तपास खरा असल्याचा भास निर्माण केला. या सर्वावर विश्वास ठेवून त्या ज्येष्ठ नागरिकाने वेगवेगळ्या खात्यांमध्ये तब्बल 27 व्यवहार केले आणि एकूण 52 कोटी रुपये फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग केले.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी VPN चा वापर करून आपले ठिकाण लपवले आणि तपास चुकविण्याचा प्रयत्न केला. सायबर सेलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत मुंबईत राहणाऱ्या 26 वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्रीला सायबर फसवणूक करणाऱ्यांनी 6.5 लाख रुपयांनी फसवले. पोलिसांनी सांगितले की- या फसवणूक करणाऱ्यांनी अभिनेत्रीला तब्बल सात तास डिजिटल अटकेत ठेवले.
advertisement
अभिनेत्रीला सलग काही फोन कॉल आले. त्यात एक व्हिडिओ कॉलही होता. ज्या व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलिसांमधील अधिकारी म्हणून सादर केले होते. या कॉल्सवर विश्वास ठेवून ती त्यांच्या जाळ्यात अडकली. अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/देश/
“सरकारकडून बोलतोय…” एवढंच ऐकलं; Digital Arrest अंगावर काटा आणणारा प्रकार, पोलिसही थक्क