Indore Couple Missing: राजा रघुवंशीचा खून करणारी सोनम गरोदर? प्रेग्नन्सी टेस्टमध्ये काय समोर आलं?

Last Updated:

Indore Couple Missing: राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशीची सोमवारी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. डॉक्टरांच्या तीन सदस्यीय महिला वैद्यकीय पथकाने सोनमची सविस्तर वैद्यकीय तपासणी केली.

News18
News18
Raja Raghuwanshi Honeymoon Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशीची सोमवारी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. डॉक्टरांच्या तीन सदस्यीय महिला वैद्यकीय पथकाने सोनमची सविस्तर वैद्यकीय तपासणी केली. ज्यामध्ये तिच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीची तपासणी करण्यात आली. वैद्यकीय सूत्रांनुसार, सोनम अत्यंत घाबरलेली आणि मानसिकदृष्ट्या धसका घेतलेल्या अवस्थेत दिसत होती. तपासणीदरम्यान, तिला अशक्त वाटत होतं, ज्यामुळे तिला सकाळपासून एनर्जी ड्रिंक्स आणि ज्यूस देण्यात आले. रिपोर्टनुसार, सोनमच्या शरीरावर कोणतीही बाह्य जखम किंवा खुणा आढळल्या नाहीत.

सोनम रघुवंशीच्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये काय समोर आलं?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनमची गर्भधारणा चाचणी देखील करण्यात आली होती. ज्याचा अहवाल स्पष्टपणे येऊ शकला नाही. डॉक्टरांच्या पॅनेलने सोनमच्या प्रेग्नन्सीबाबत रिपोर्टमध्ये "अनिर्णित" असा उल्लेख केला आहे. तसेच आणखी एका आठवड्यानंतर पुन्हा सोनमचा अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की सुरुवातीच्या टप्प्यात प्रेग्नन्सी चाचणीचे अचूक निकाल मिळणे कठीण असतं. त्यामुळे सोनम प्रेग्नंट आहे की नाही? हे कळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहणं आवश्यक आहे.
advertisement

सोनमला घेऊन पोलीस मेघालयला रवाना

गर्भधारणा चाचणीच्या अस्पष्ट अहवालामुळे या प्रकरणात एक नवीन आणि संवेदनशील वळण आले आहे. ज्यामुळे तपास यंत्रणांची दक्षता आणखी वाढली आहे. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सोनमला मेघालय पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे. तिची पुढची चौकशी मेघालयात केली जाईल. जिथे पोलीस तिला गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जातील आणि हत्याकांडातील सर्व बारकावे तपासले जातील. मेघालयातील शिलाँग येथे हनिमूनसाठी गेलेल्या सोनम रघुवंशीवर आता तिचा पती राजा रघुवंशी यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
advertisement

सोनमला 72तासांची पोलीस कोठडी

पतीची हत्या केल्यानंतर सोनम मागील १७ दिवसांपासून बेपत्ता होती. रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूरला पोहोचली. त्यानंतर तिला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. सोमवारी सोनमला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने सोनमला ७२ तासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या मेघालय पोलिसांचे पथक कडक सुरक्षा व्यवस्थेत सोनमला घेऊन शिलाँगला रवाना झालं आहे.
मराठी बातम्या/देश/
Indore Couple Missing: राजा रघुवंशीचा खून करणारी सोनम गरोदर? प्रेग्नन्सी टेस्टमध्ये काय समोर आलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement