Bihar Election :गुंडाची धुलाई करणाऱ्या 'सिंघम'ची राजकारणात एन्ट्री, मराठमोळे IPS शिवदीप लांडे कुठून निवडणूक लढवणार?

Last Updated:

Bihar Election : धडाकेबाज कारवाई करून आपली छाप पाडणारे 'सिंघम' अशी ओळख निर्माण केलेले मराठमोळे अधिकारी शिवदीप लांडे हे आता निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत.

गुंडाची धुलाई करणाऱ्या 'सिंघम'ची राजकारणात एन्ट्री, मराठमोळे  IPS शिवदीप लांडे कुठून निवडणूक लढवणार?
गुंडाची धुलाई करणाऱ्या 'सिंघम'ची राजकारणात एन्ट्री, मराठमोळे IPS शिवदीप लांडे कुठून निवडणूक लढवणार?
पाटणा: मागील काही वर्षात प्रशासकीय सेवेत राजकारणात काही अधिकारी उतरले आहेत. यामध्ये आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह इतरांनीही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. यातील काहींची दुसरी इनिंग चांगलीच ठरली. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. बिहारच्या गुन्हेगारी जगतावर धडाकेबाज कारवाई करून आपली छाप पाडणारे 'सिंघम' अशी ओळख निर्माण केलेले मराठमोळे अधिकारी शिवदीप लांडे हे आता निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. बिहारमधूनच निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत.
advertisement
'सुपरकॉप' ओळख असलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा स्वतः पत्रकार परिषदेत केली आहे. लांडे यांनी सांगितले की, ते जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. “मी या दोन्ही मतदारसंघात पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. त्या काळात गरीब, मजूर आणि पीडितांसाठी लढा दिला होता. आजही तिथली जनता माझ्याशी जोडलेली आहे आणि त्यांच्या आग्रहामुळेच मी या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले. बिहारमध्ये त्यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारी जगाला हादरे देणाऱ्या आणि भ्रष्टाचारविरोधी कारवाईंमुळे चर्चेत राहिले.
advertisement

कोणत्या पक्षातून उमेदवारी?

यंदाच्या बिहार निवडणुकीत सेवेतील माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने राजकारणात उतरले आहेत. त्यात मुक्तेश्वर पांडे, आनंद मिश्रा आणि विकास वैभव यांचाही समावेश आहे. शिवदीप लांडे यांनी बिहार पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर राजकारणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी आपल्या हिंद सेना नावाच्या पक्षाची घोषणा केली होती. मात्र, नोंदणी प्रक्रियेतील काही बाबींमुळे त्यांनी आता बिहारमधून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement

शिवदीप लांडे कोण आहेत?

अकोल्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले लांडे हे 2006 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतरे यांचे ते जावई आहेत. पोलीस सेवेत त्यांनी पाटणा, मुंगेर आणि अररिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. शिवदीप लांडे यांनी आपल्या पोलीस सेवेतील सर्वाधिक काळ, जवळपास 18 वर्षे बिहारमध्ये प्रशासकीय सेवेत घालवला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
Bihar Election :गुंडाची धुलाई करणाऱ्या 'सिंघम'ची राजकारणात एन्ट्री, मराठमोळे IPS शिवदीप लांडे कुठून निवडणूक लढवणार?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement