आणखी एका बड्या पोलीस अधिकाराने आयुष्य संपवलं, 'त्या' एका गोष्टीपुढे मानली हार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एएसआय सत्यनारायण यांनी दुपारी 1.30 च्या सुमारास त्यांच्या घरी गळफास घेतला.
नवी दिल्ली : तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील विशेष शाखेच्या युनिटमध्ये तैनात असलेल्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने शनिवारी दुपारी त्यांच्या घरी आत्महत्या केली. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय एएसआय सत्यनारायण यांनी दुपारी 1.30 च्या सुमारास त्यांच्या घरी गळफास घेतला. सत्यनारायण गेल्या वर्षभरापासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होते.
सूर्यपेट ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणाले, सत्यनारायण त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे मोठ्या तणावाखाली होते. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. आत्महत्येचा नेमंक कारण काय? याचा तपास सुरू आहे.
तेलंगणात एका IPS अधिकाऱ्याची आत्महत्या
तेलंगणापूर्वी हरियाणातील एका आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. तेलंगणामध्ये या पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूची बातमी हरियाणाचे पोलीस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या आत्महत्येनंतर आली आहे. आयपीएस पुरण कुमार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. 2001 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार हे 7 ऑक्टोबर रोजी त्यांच्या सेक्टर 11 येथील घराच्या तळघरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर गोळी लागली होती आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट सोडली होती.
advertisement
अधिकाऱ्यांवर केला आरोप
आयपीएस अधिकाऱ्याने त्यांच्या सुसाईड नोटमध्ये आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप केला होता. या आठ आरोपींमध्ये हरियाणाचे डीजीपी कपूर आणि तत्कालीन रोहतकचे पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजर्निया यांचा समावेश होता. पुरण कुमार यांनी दोघांवरही छळ आणि बदनामी केल्याचा आरोप केला होता. अधिकाऱ्याने त्यांच्या आत्महत्येमागे इतर अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कथित छळाचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये जाती-आधारित भेदभावाचाही समावेश होता.
advertisement
6 सदस्यीय एसआयटी समिती गठित
आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी ६ सदस्यीय एसआयटीची समिती गठित करण्यात आली आहे. दरम्यान, चंदीगड पोलिसांनी या प्रकरणाचा जलद आणि निष्पक्ष तपास करण्यासाठी आयजी पुष्पेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यीय एसआयटीची समिती गठित करण्यात आली आहे
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 12, 2025 9:22 PM IST